-
बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टने ‘गंगुबाई काठियावाडी’ चित्रपटात गंगुबाईची भूमिका साकारून प्रेक्षकांची मने जिंकून घेतली.
-
या चित्रपटातील आलियाच्या अभिनयाचे सर्वत्र कौतुक झाले.
-
‘गंगुबाई काठियावाडी’ नंतर आता आलिया पुन्हा एकदा अभिनयाची छाप सोडण्यासाठी तयार आहे.
-
आलियाच्या आगामी चित्रपटांतून प्रेक्षकांना तिच्या अभिनयाची जादू अनुभवायला मिळणार आहे.
-
दिग्दर्शक एस. एस. राजमौली यांच्या बहुप्रतिक्षित ‘आरआरआर’ या चित्रपटातून आलिया प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
-
२५ मार्च रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार असून यात आलिया ‘सिता’ हे पात्र साकारताना दिसेल.
-
‘रॉकी और राणी की प्रेम कहाणी’ या चित्रपटात आलिया पुन्हा एकदा अभिनेता रणवीर सिंगसोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे.
-
याआधी ‘गली बॉय’ या चित्रपटात त्यांनी एकत्र काम केलं होतं.
-
‘ब्रम्हास्त्र’ या बॉलिवूड चित्रपटाची आलियाच्या चाहत्यांना उत्सुकता आहे.
-
या चित्रपटातून आलिया आणि रणबीर कपूर पहिल्यांदाच ऑन स्क्रीन एकत्र दिसणार आहेत.
-
आलिया भट्ट आगामी ‘जी ले जरा’ या चित्रपटात प्रियांका चोप्रा आणि कतरिना कैफसोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे.
-
(सर्व फोटो : आलिया भट्ट/ फेसबुक)

VIDEO: “खूप आवडते मला ती, पण…” काकांनी लिहिलेली पुणेरी पाटी वाचायला लोकांची गर्दी; शेवटची ओळ ऐकून पोट धरुन हसाल