-
विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित आणि अनुपम खेर यांची प्रमुख भूमिका असलेला ‘द कश्मीर फाइल्स’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई करताना दिसत आहे.
-
‘द कश्मीर फाइल्स’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवरील सर्व रेकॉर्ड ब्रेक केले आहेत.
-
हा चित्रपट प्रदर्शित होऊन एक आठवडाही पूर्ण झालेला नाही. पण लवकरच हा चित्रपट १०० कोटींच्या क्लबमध्ये प्रवेश करणार आहे.
-
चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘द कश्मीर फाइल्स’ हा चित्रपट ११ मार्च रोजी प्रदर्शित झाला.
-
काश्मीरमधील पंडितांवर १९९० साली झालेल्या अत्याचारांसंदर्भातील कथानकावर हा चित्रपट आधारित आहे.
-
या चित्रपटाने सातव्या दिवशी १८.०५ कोटी रुपयांची कमाई केली आहे. त्यामुळे या चित्रपटाचे एकूण बॉक्स ऑफिस कलेक्शन ९७.३० कोटी झाले आहे.
-
हा चित्रपट सुरुवातीला ६५० स्क्रीन्सवर प्रदर्शित करण्यात आला होता. मात्र त्यानंतर प्रेक्षकांचा वाढता प्रतिसाद पाहून हा चित्रपट सध्या ४ हजारांहून अधिक स्क्रीन्सवर प्रदर्शित होत आहे. तसेच चित्रपटाच्या कमाईतही दिवसेंदिवस वाढ होत आहे.
-
‘द कश्मीर फाइल्स’ या चित्रपटाने प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी ३.५५ कोटींची कमाई केली होती.
-
तर दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने पहिल्या दिवसाच्या दुप्पट म्हणजे ८.५० कोटींची कमाई केली.
-
या चित्रपटाने तिसऱ्या दिवशी १५.१० कोटी, चौथ्या दिवशी १५.०५ कोटी, पाचव्या दिवशी १८ कोटी आणि सहाव्या दिवशी १९.०५ कोटींची कमाई केली होती.
-
त्यानंतर आता सातव्या दिवशी या चित्रपटाने १८.०५ कोटींचा गल्ला जमवला आहे.
-
त्यामुळे सहाव्या दिवसापर्यंत एकूण ७९.२५ कोटी रुपये कमाई असलेल्या या चित्रपटाने सातव्या दिवसअखेर ९७.३० कोटी कमावले आहे.
-
नुकतंच या चित्रपटाने जगभरात १०६.८० कोटींचा गल्ला बॉक्स ऑफिसवर कमावला आहे.
-
‘द कश्मीर फाइल्स’ हा चित्रपट ११ मार्चला प्रदर्शित झाला. हा चित्रपट १९९० च्या दशकातील काश्मिरी पंडितांचे पलायन आणि त्यांची निर्दयी हत्या यावर आधारित आहे.
-
या चित्रपटात अनुपम खेर, मिथुन चक्रवर्ती, दर्शन कुमार, पल्लवी जोशी आणि चिन्मय मांडलेकर यांसारखे प्रसिद्ध कलाकार प्रमुख भूमिकेत पाहायला मिळत आहेत.

महिलांनो, फ्रिजमध्ये एकदा नक्की ठेवा मिठाने भरलेली वाटी; तुमची पावसाळ्यातील ‘ही’ मोठी समस्या होईल कायमची दूर, पाहा कमाल