-
बॉलिवूडची क्वीन आणि पद्मश्री पुरस्काराने सन्मानित अभिनेत्री कंगना रणौतचा आज ३५वा वाढदिवस आहे.
-
मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी केलेलं वक्तव्य असो अथवा शेतकरी आंदोलनातील शेतकऱ्यांची दहशतवाद्यांशी केलेली तुलना असो. कंगना आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असते.
-
सध्या कंगना ‘लॉक-अप’ हा रिअॅलिटी शो होस्ट करत आहे.
-
२००६ साली ‘गँगस्टर’ या चित्रपटातून कंगनाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं.
-
कंगनाचा जन्म मनालीपासून सुमारे दीडशे किलोमीटर दूर असलेल्या भांबला गावात झाला.
-
तिचं मनालीमध्ये आलिशान असं घर आहे.
-
आठ रुम असलेल्या या घराची किंमत सुमारे ३० करोड रुपये इतकी आहे.
-
कंगनाचं मुंबईतील खार भागात असलेल्या इमारतीत तीन फ्लॅट आहेत.
-
या फ्लॅटची किंमत सुमारे ५ करोडच्या घरात आहे.
-
याशिवाय कंगनाचं मुंबईत ऑफिस देखील आहे.
-
२०१७ मध्ये हे ऑफिस तिने विकत घेतलं होतं. त्याची किंमत सुमारे ४८ करोड रुपये इतकी आहे.
-
ऑफिसमधील इंटिरिअरसाठी २० करोड रुपये खर्च करण्यात आल्याचं कंगनाने सांगितलं होतं.
-
कंगनाकडे बीएमडब्ल्यू ७ सीरीज आणि मर्सिडीज-बेन्झ जीएलई-क्लास एसयूवी या दोन महागड्या गाड्या देखील आहेत.
-
कंगना एकूण ९४ करोड रुपये संप्पतीची मालकीण आहे. वर्षाला सुमारे ती १५ करोड रुपये कमावते.
-
(सर्व फोटो : कंगना रणौत/ फेसबुक)

‘एचएसआरपी’ नंबर प्लेटबाबत हायकोर्टाचे महत्त्वपूर्ण विधान; म्हणाले, “अधिकचे दर…”