-
दाक्षिणात्य कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेता अल्लू अर्जुनचा आज वाढदिवस.
-
काही महिन्यांपूर्वी अल्लू अर्जुनचा ‘पुष्पा द राइज’ हा चित्रपट प्रदर्शित झाला.
-
या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली.
-
अल्लू अर्जुन स्टायलिश अंदाज आणि आलिशान राहणीमानासाठी विशेष ओळखला जातो.
-
हैदराबादमध्ये अल्लू अर्जुनचं आलिशान घर आहे.
-
अल्लू अर्जुनच्या घरात थिएटर, मुलांना खेळण्यासाठी वेगळी खोली, पाहुण्यांसाठी वेगळ्या खोल्या, स्विमिंग पूल आहे.
-
अल्लू अर्जुनच्या या बंगल्याची किंमत जवळपास १०० कोटी रुपये आहे.
-
अल्लू अर्जुन हा दाक्षिणात्य सुपरस्टार चिरंजीवी यांचा भाचा आहे.
-
२०११ साली अल्लू अर्जुनने स्नेहा रेड्डीसोबत लग्नगाठ बंधली.
-
अल्लू अर्जुनला अयान हा मुलगा आणि आऱ्हा ही मुलगी आहे.
-
२०१६ मध्ये ‘गूगल’वर सर्वाधिक सर्च केला जाणारा टॉलिवूड सेलिब्रिटी अल्लू अर्जुन होता.
-
अल्लू अर्जुनचा फोर्ब्स इंडियाच्या मासिकातही समावेश होता.
-
अल्लू अर्जुनला महागड्या गाड्याचं प्रचंड वेड आहे.
-
अल्लू अर्जुनकडे स्वत:ची वॅनिटी वॅन आहे.
-
या वॅनिटी वॅनमध्ये सर्व सुखसुविधा आहेत.
-
अल्लू अर्जुनच्या या वॅनिटीची किंमत जवळपास ७ कोटी रुपये आहे.
-
अल्लू अर्जुनकडे लग्झरी गाड्या देखील आहेत.
-
अल्लू अर्जुनची क्रेझ केवळ टॉलिवूडमध्येच नव्हे तर बॉलिवूडमध्येदेखील असल्याचं पाहायला मिळतं.
-
मीडिया रिपोर्ट्सनुसार अल्लू अर्जुनची एकूण संपत्ती ३५० कोटी रुपये आहे.
-
अल्लू अर्जुन हा एका वर्षात जवळपास ३२ कोटी रुपये कमवतो.
-
(सर्व फोटो सौजन्य : अल्लू अर्जुन / इन्स्टाग्राम)

Kitchen Jugaad Video: दसऱ्याला वापरलेली झेंडूची फुलं फेकू नका; कढईत टाका, होईल मोठा फायदा की तुम्ही विचारही केला नसेल