-
बॉलिवूडमधील सर्वाधिक चर्चेत असलेल्या जोड्यांपैकी एक म्हणजे रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांची जोडी.
-
गेल्या काही दिवसांपासून आलिया आणि रणबीरच्या लग्नाच्या चर्चा सुरु आहेत.
-
येत्या १७ एप्रिलला ते दोघेही विवाहबंधनात अडकणार असल्याचं बोललं जात आहे.
-
मुंबईतील ‘आरके हाऊस’मध्ये आलिया आणि रणबीर सप्तपदी घेणार असून १३ एप्रिलपासून लग्नाच्या विविध सोहळ्यांना सुरुवात होणार आहे.
-
कुटुंबीय आणि नातेवाईक या विवाहसोहळ्याला उपस्थित राहणार आहेत.
-
आलिया आणि रणबीर गेल्या अनेक वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहेत.
-
बॉलिवूडमधील या प्रसिद्ध जोडीचा चाहता वर्ग देखील मोठा आहे. चाहते प्रेमाने या जोडीला ‘रालिया’ असं म्हणतात.
-
आलिया ११ वर्षांची असल्यापासूनच रणबीर कपूर तिला आवडत असल्याचं तिने एका मुलाखतीदरम्यान सांगितलं होतं.
-
दिग्दर्शक संजय लीला भन्साली यांच्या ‘ब्लॅक’ या चित्रपटाच्या ऑडिशनसाठी गेली असताना पहिल्यांदा आलियाने रणबीरला पाहिले.
-
तेव्हा रणबीर सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम करत होता.
-
‘कॉफी विथ करण’ या कार्यक्रमादरम्यान आलियाने रणबीर सोबत लग्न करण्याची इच्छा देखील बोलून दाखविली होती.
-
२०१२ साली ‘स्टुडंट ऑफ द इयर’ या चित्रपटातून आलियाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.
-
त्यानंतर रणबीर आणि आलिया पार्टी, कार्यक्रमादरम्यान एकमेकांना भेटू लागले.
-
अनेक ठिकाणी त्यांना एकत्र स्पॉट देखील करण्यात आलं होतं.
-
त्यामुळे हे दोघेही एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा रंगू लागल्या होत्या.
-
बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूर आणि आनंद अहुजा यांच्या लग्न सोहळ्यात आलिया आणि रणबीर जोडीने हजेरी लावल्यानंतर ते रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं.
-
नंतर ते दोघेही कौटुंबिक कार्यक्रम, डिनर, पार्टीमध्ये एकत्र दिसू लागले.
-
अनेक वर्ष एकमेकांसोबत वेळ घालवल्यानंतर आलियाने गेल्याच वर्षी तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून रणबीरसाठी खास पोस्ट शेअर करत प्रेमाची कबुली दिली होती.
-
यावरून ते दोघेही एकमेकांच्या अखंड प्रेमात असल्याचं समजल्यानंतर चाहते देखील खुश झाले होते.
-
आता आलिया आणि रणबीर लग्नाच्या बेडीत अडकून त्यांच्या पुढील आयुष्याची नवी सुरुवात करणार आहेत.
-
(सर्व फोटो :इंडियन एक्सप्रेस)

रस्त्यावर झोपलेल्या व्यक्तीजवळ सिंह आला अन् वास घेत पुढे केलं असं काही की…; VIDEO पाहून भरेल धडकी