एसएस राजामौली यांच्या RRR या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अनेक रेकॉर्ड मोडले आहेत. ज्युनियर एनटीआर आणि राम चरण स्टारर या चित्रपटाने १००० कोटींहून अधिक कमाई केली आहे. हा चित्रपट सातत्याने प्रेक्षकांची मने जिंकत असताना, असे अनेक चित्रपट आहेत जे रेकॉर्डब्रेक ओपनिंग करूनही फ्लॉप ठरले. चला तर मग जाणून घेऊया अशाच काही लोकप्रिय चित्रपटांची नावे
-
१९९५ साली त्रिमूर्ती हा चित्रपट आला. हा चित्रपट मुकुल एस आनंद आणि सुभाष घई यांनी दिग्दर्शित केला होता. या चित्रपटात जॅकी श्रॉफ, अनिल कपूर आणि शाहरुख खानसारखे स्टार्स होते.(photo credit: social media)
-
या चित्रपटाने पहिल्याच दिवशी १ कोटींहून अधिक कमाई केली होती. पहिल्याच दिवशी १ कोटींचा टप्पा पार करणारा हा पहिलाच चित्रपट ठरला आहे. असे असूनही हा चित्रपट फ्लॉप झाला. चित्रपटाचा एकूण व्यवसाय फक्त ८ कोटींच्या आसपास होता. (photo credit: social media)
-
अजय देवगण, अमिताभ बच्चन, सुष्मिता सेन आणि मनीषा कोईराला यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या हिंदुस्तान की कसम या चित्रपटाने पहिल्या दिवशी १.४५ कोटी रुपयांचा विक्रमी व्यवसाय केला. मात्र नंतर हा चित्रपटही फ्लॉप ठरला.(photo credit: jansatta/ social media)
-
ठग्स ऑफ हिंदोस्तान २०१८ मध्ये आला होता. या चित्रपटात आमिर खान, अमिताभ बच्चन आणि कतरिना कैफसारखे कलाकार होते. या चित्रपटाने पहिल्याच दिवशी ५० कोटींहून अधिक कमाई करण्याचा विक्रम केला आहे.(photo credit: indian express)
-
विक्रमी कमाई केल्यानंतर या चित्रपटाचे लाइफटाईम कलेक्शन केवळ १३८ कोटी होते. हा चित्रपट फ्लॉप ठरला. (photo credit: indian express)
-
२००० मध्ये, अभिषेक बच्चन आणि करीना कपूर यांनी जेपी दत्ता यांच्या रेफ्युजी या चित्रपटातून पदार्पण केले. या चित्रपटाने पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर १.५७ कोटी रुपयांची विक्रमी कमाई केली. पुढे हा चित्रपटही फ्लॉप ठरला.(photo credit: indian express)
-
२००५ मध्ये केतन मेहता दिग्दर्शित मंगल पांडे या चित्रपटाने पहिल्याच दिवशी ३.२४ कोटी रुपयांची विक्रमी कमाई केली होती. मात्र आमिर खान आणि राणी मुखर्जीचा हा चित्रपट फ्लॉप ठरला.(photo credit: indian express)