-
आलिया भट्ट आणि रणबीर कपूर त्यांच्या लग्नामुळे चर्चेत आहेत. दोघांनी १४ एप्रिल रोजी कुटुंबीय आणि मित्रांच्या उपस्थितीत लग्न केले. अशा परिस्थितीत आलिया भट्ट आणि रणबीर कपूरचा वेडिंग लूक चर्चेत राहिला आहे. (फोटो: indian express)
-
आलियाने तिच्या लग्नात क्लासिक लाल लेहेंग्याऐवजी ऑफ-व्हाइट रंगाची साडी नेसली होती. ही साडी डिझायनर सब्यसाची यांनी डिझाईन केली आहे. तसेच आलियाच्या आधीही अनेक बॉलिवूड अभिनेत्रींनी क्लासिक रेड वेडिंग आउटफिटऐवजी वेगल्या रंगाचे लेहेंगे परिधान केले आहे. (फोटो: indian express)
-
ऐश्वर्या रायने लग्नात सोनेरी आणि पिवळ्या रंगाची कॉम्बिनेशन साडी परिधान केली होती. त्यावेळी ऐश्वर्याशी संबंधित एका सूत्राने सांगितले होते की, अभिनेत्रीने लाल रंगाचे कोणतेही कपडे घालण्याचा विचार केला नव्हता. ऐश्वर्या रायच्या वेडिंग आउटफिटमध्ये लाल रंग नव्हता. ऐश्वर्याच्या गोल्डन साडीची किंमत ७५ लाख रुपये होती. (फोटो: indian express)
-
करीना कपूरनेही तिच्या लग्नात लाल रंगाचा पोशाख परिधान केला नव्हता. करिनाने तिच्या लग्नाच्या दिवशी तिची सासू शर्मिला टागोर यांच्या लग्नाचा लेहेंगा परिधान केला होता. या लेहेंग्याचा रंग केशरी आणि हिरवा होता. (फोटो: indian express)
-
अभिनेत्री अनुष्का शर्माने तिच्या लग्नात गुलाबी रंगाचा लेहेंगा परिधान केला होता. अनुष्काचा हा लूक खूप आवडला होता. तिचा हा अतिशय सुंदर गुलाबी लेहेंगाही सब्यसाची यांनी डिझाईन केला होता. (फोटो: indian express)
-
अभिनेत्री कोंकणा सेन शर्मानेही तिच्या लग्नात लाल रंगाचा लेहेंगा परिधान केला नव्हता. तिने रणवीर शौरीसोबत गोल्डन क्रीम कलरच्या साडीत लग्न केले. कोंकणाचा हा लूक चाहत्यांना खूप आवडला होता. (फोटो: indian express)
-
करीना कपूरची मोठी बहीण आणि अभिनेत्री करिश्मानेही तिच्या लग्नात लाल लेहेंग्याऐवजी गुलाबी रंगाचा लेहेंगा निवडला होता. करिश्माने संजय कपूरसोबत लग्न केले. या लग्नाची त्यावेळी बरीच चर्चा झाली होती. (फोटो: indian express)
-
करिनाच्या बहिणीशिवाय, मेहुणी सोहा अली खानने देखील तिच्या लग्नासाठी लाल रंगाऐवजी ऑफ-व्हाइट कलरचा लेहेंगा निवडला. (फोटो: indian express)
-
या सुंदर लेहेंग्यात गोल्डन डिझाईन वर्क करण्यात आले होते. हा लेहेंगा डिझायनर जेजे यांनी तयार केले आहे. (फोटो: indian express)

“ज्याची भीती होती तेच घडलं”, ट्रम्प यांच्या टॅरिफ बॉम्बनंतर अमेझॉन, वॉलमार्टचा मोठा निर्णय; भारताची चिंता वाढली