-
झी मराठीवरील ‘येऊ कशी तशी मी नांदायला’ या मालिकेतून अभिनेत्री मीरा जगन्नाथ घराघरात पोहोचली.
-
‘बिग बॉस’ मराठी ३मध्ये सहभागी झालेली मीरा पहिल्या दिवसापासून चर्चेत राहिली होती.
-
मीराने नुकतेच फोटोशूट केले असून त्याचे फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत.
-
नऊवारी साडी, नथ, चंद्रकोर टिकली, झुमके असा पारंपरिक वेश मीराने केला आहे.
-
मीराने परिधान केलेल्या पांढऱ्या रंगाच्या साडीमध्ये तिचे सौंदर्य अधिकच खुलून आले आहे.
-
मीराचा हा मराठमोळा साज प्रेमात पाडणारा आहे.
-
मीराच्या या खास लूकसाठी ऐश्वर्या शेलार यांनी मेकअप केला आहे.
-
या फोटोंवर लाइक्स व कमेंट्सचा वर्षाव होत आहे.
-
मीरा चित्रपटसृष्टीत येण्याआधी योग प्रशिक्षक म्हणून काम करत होती.
-
मीरा ही अभिनेत्री आणि एक उत्तम नृत्यांगना आहे.
-
मीराने झी मराठीवरील ‘माझ्या नवऱ्याची बायको’ या मालिकेत काम केले होते.
-
(सर्व फोटो सौजन्य : मीरा जगन्नाथ / इन्स्टाग्राम)

Daily Horoscope: कोणत्या राशींवर राहणार माता लक्ष्मीची विशेष कृपा? वैवाहिक जीवनात सुख ते मानसिक गोंधळ होईल दूर; वाचा १२ राशींचे राशिभविष्य