-
‘सैराट’ या चित्रपटातून घराघरात पोहोचलेला अभिनेता आकाश ठोसर सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.
-
आकाश ठोसरने नुकतीच पुण्यातील राजगड किल्ल्याला भेट दिली.
-
“सह्याद्रीचं सुख हे शब्दांत मांडता येत नाही, तर ते प्रत्यक्षात अनुभवावच लागतं.” असं कॅप्शन देत आकाशने हे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
-
राजगड! छत्रपती शिवाजी महाराजांची पहिली राजधानी.
-
पद्मावती, सुवेळा आणि संजीवनी या तीन अभेद्य माच्या आणि मधोमध कातळ पर्वतावर बालेकिल्ला अशी या गडाची रचना.
-
राजगड हा अतिशय उंच आहे. त्याची उंची पाहता तो सर्व किल्ल्यांत श्रेष्ठ आहे.
-
राजगडचा घेर बारा कोसांचा आहे. त्याच्या मजबुतीची आणि उंचीची कल्पनाही करवत नाही.
-
“गडांचा राजा, राजियांचा गड – किल्ले राजगड” असं कॅप्शन आकाशने या फोटोला दिले आहे.
-
राजगडाचे रूप कायम चिरतरुण, लोभस असे. कुठल्याही ऋतूत पाहावे असे.
-
(सर्व फोटो सौजन्य : आकाश ठोसर / इन्स्टाग्राम)

Rohini Khadse Husband Pranjal Khewalkar Arrest : पतीसाठी रोहिणी खडसेंची पोस्ट; रेव्ह पार्टी प्रकरणातील अटकेवर म्हणाल्या, “प्रत्येक गोष्टीला…”