-
स्टार प्रवाहवर २ मे पासून सुरु होणाऱ्या ‘तुझेच मी गीत गात आहे’ मालिकेच्या प्रोमोला प्रेक्षकांचा भरभरुन प्रतिसाद मिळत आहे.
-
चिमुकल्या स्वराच्या निरागस जगाविषयी जाणून घेण्याची प्रत्येकालाच उत्सुकता आहे.
-
गाण्याची आवड असणारी स्वरा ज्या गायकाच्या प्रेमात आहे त्या सुप्रसिद्ध गायक मल्हारची भूमिका साकारणार आहे अभिनेता अभिजीत खांडकेकर.
-
‘तुझेच मी गीत गात आहे’ मालिकेतल्या या भूमिकेविषयी सांगताना अभिजीत म्हणाला, आपल्या प्रत्येकाच्याच मनात एक सुप्त इच्छा असते की, आपण मोठं झाल्यावर गायक व्हावं.
-
या मालिकेच्या निमित्ताने गायक बनण्याची माझी ही इच्छा पूर्ण होत आहे.
-
मी गायक नाही मात्र उत्तम कानसेन आहे.
-
याआधी आरजे आणि सूत्रसंचालनाचा अनुभव असल्यामुळे संगीतक्षेत्राशी निगडीत सर्वच मान्यवरांसोबत भेटीचा योग आला आहे.
-
त्यामुळे मालिकेत गायकाची भूमिका साकारणं अवघड नाही मात्र आव्हानात्मक नक्कीच आहे.
-
कुठलंही नवं काम नेहमीच नवी स्फुर्ती घेऊन येत असतं. त्यामुळे सध्या उत्सुकता आणि हुरहुर अश्या दोन्ही भावना आहेत.
-
जुन्या भूमिकेची नेहमीच प्रेक्षकांच्या मनावर छाप असते. त्यामुळे नवी भूमिका प्रेक्षकांच्या मनात उतरवणं हे आव्हानात्मक असतं.
-
स्टार प्रवाहच्या सर्वच मालिका प्रेक्षक प्रेमाने पहात आहेत आणि टीआरपीच्या रुपात भरभरुन प्रेम देत आहेत.
-
त्यामुळे महाराष्ट्राच्या नंबर वन वाहिनीसोबत जोडला जाण्याचा आनंद शब्दात व्यक्त करता येत नाहीय.
-
याआधी मी साकारलेल्या भूमिकांवर प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम केलं आहे.
-
या नव्या कलाकृतीला देखिल तेवढंच प्रेम मिळेल ही आशा आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : अभिजीत खांडकेकर / इन्स्टाग्राम)

ना मॉम, ना मम्मी…; परदेशात राहूनही जपले मराठी संस्कार! माधुरी दीक्षितची मुलं तिला ‘या’ नावाने मारतात हाक, पाहा फोटो