-
झी मराठीवर नुकतंच प्रेक्षकांच्या भेटीस आलेली ‘तू तेव्हा तशी’ ही मालिका प्रेक्षकांच्या भलतीच पसंतीस पडली आहे.
-
या मालिकेतील व्यक्तिरेखा देखील प्रेक्षकांना आपल्याशा वाटतात.
-
या मालिकेतील एक व्यक्तिरेखा जी सगळ्यांचं लक्ष वेधून घेतेय ती म्हणजे अनामिकाची मुलगी राधा.
-
राधाची व्यक्तिरेखा प्रसिद्ध कवी संदीप खरे यांची मुलगी रुमानी खरे साकारतेय.
-
रुमानीची ही पहिलीच मालिका आहे.
-
राधा या भूमिकेबद्दल रुमानीसोबत साधलेला हा खास संवाद…
-
१. ही भूमिका तुला कशी मिळाली?
– ‘तू तेव्हा तशी’ या मालिकेत राधा या भूमिकेसाठी कुठल्याही कलाकाराची निवड झाली नसल्याचं मला कळलं. -
ऑडिशन सुरु आहे हे कळताच मी या भूमिकेसाठी ऑडिशन दिलं आणि त्यानंतर माझं सिलेक्शन झालं आणि माझा राधा म्हणून या मालिकेतील प्रवासाला सुरुवात झाली.
-
२. ही तुझी टीव्ही मालिकेतील प्रथमच भूमिका आहे, त्याबद्दल काय सांगशील?
– माझी पहिलीच टीव्ही मालिकेतील भूमिका ती पण राधासारखी बोल्ड आणि बिनधास्त भूमिका माझ्या वाट्याला आली याचा मला आनंद आहे. -
राधा सध्याच्या टीनएजर्सचं प्रतिनिधित्व करत असल्यामुळे मला ती साकारताना जास्त जवळची वाटते.
-
३. तुला अभिनयाची गोडी कशी लागली? मालिकेच्या तुझ्यासोबत अनेक दिग्गज कलाकार आहेत, त्यांच्याकडून किती शिकायला मिळतं?
– अभिनयाची गोडी मला आधीपासूनच होती आणि म्हणूनच एसपी कॉलेजमध्ये शिकताना मी एकांकिका आणि लघुपटांमध्ये सहभागी व्हायला सुरुवात केली. -
मालिकेची निर्मिती संस्था, दिग्दर्शक आणि अनुभवी सहकलाकार यांच्याकडून खूप शिकायला मिळतंय.
-
४. वडील कलाक्षेत्रात असल्यामुळे तुला त्यांच्या अनुभवाचा फायदा झाला का?
– लोकांशी कसं जुळवून घ्यावं, मीडियाला कसं सामोरं जावं, काम निवडताना काय विचार करावा हे सगळं करताना मी बाबांना लहानपणापासून बघत आलेय. -
मनोरंजन क्षेत्राशी संबंधित पालक असतील तर त्या क्षेत्राची करियर म्हणून निवड केली की नक्की मदत होते.
-
या क्षेत्रातील समस्या, कामाची आणि उत्पन्नाची अनिश्चितता, कधी-कधी काही प्रोजेक्ट्स अर्धवट गुंडाळणं या सगळ्याला सामोरं कसं जायचं याचे धडे घरातच मिळतात.
-
आई-वडील कलाकार असतील तर त्यांचे अनुभव, संपर्क वापरून होणारे उपयोग आणि गैरफायदे यात एक पुसटशी रेष आहे. ती तुम्हाला ओळखता यायला हवी.
-
अभिनयासोबतच रुमानीला डान्सचीही फार आवड आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : रुमानी खरे / इन्स्टाग्राम)

बापरे! बघता बघता अख्खा पूल गेला वाहून; गावकरी ओरडत राहिले अन्…पुराचा थरारक VIDEO पाहून धडकी भरेल