-
स्टार प्रवाहवर ‘तुझेच मी गीत गात आहे’ ही मालिका २ मे पासून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
-
अभिनेत्री प्रिया मराठेला आजवर आपण अनेक हिंदी आणि मराठी मालिकांमधून भेटत आलो आहेत.
-
प्रिया मराठेला खलनायकी व्यक्तिरेखा साकारणं आव्हानात्मक वाटतं.
-
प्रेक्षकांना ज्या व्यक्तिरेखांचा राग येतो त्या साकारताना एक अभिनेत्री म्हणून कस लागतो असं प्रियाला वाटतं.
-
‘तुझेच मी गीत गात आहे’ या मालिकेत प्रिया ‘मोनिका’ ही व्यक्तिरेखा साकारणार आहे.
-
या भूमिकेचं वेगळेपण सांगताना प्रिया म्हणाली, स्टार प्रवाहसोबत मी याआधी ‘जयोस्तुते’ आणि ‘शतदा प्रेम करावे’ या मालिका केल्या आहेत.
-
‘तुझेच मी गीत गात आहे’ मालिकेच्या निमित्ताने पुन्हा या लाडक्या वाहिनीसोबत जोडली जाणार आहे.
-
ही म्युझिकल मालिका आहे. म्हणजे अशी कविता जी अनुभवायलाच हवी.
-
‘पिहू’ नावाच्या चिमुरडीसोबत माझे बरेचसे सीन आहेत.
-
बालकलाकारांसोबत काम करताना नेहमीच मजा येते. त्यांच्या कलाने आणि त्यांचे मूड सांभाळत काम करावं लागतं.
-
आताची पीढी प्रचंड हुशार आहे. मालिकेतली चिमुकली स्वरा आणि पिहू दोघीही कमाल आहेत.
-
आमची एकमेकांशी छान गट्टी जमली आहे. ही गोष्ट मुलगी आणि तिच्या बाबांच्या प्रेमावर आधारलेली आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : प्रिया मराठे / इन्स्टाग्राम)

