-
लेखक, दिग्दर्शक आणि अभिनेते प्रविण विठ्ठल तरडे यांच्या बहुचर्चित आगामी ‘सरसेनापती हंबीरराव’ या भव्यदिव्य ऐतिहासिक चित्रपटाची आतुरता केव्हापासून प्रेक्षकांना लागून राहिली आहे.
-
या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर झाली असून हा चित्रपट २७ मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
-
काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर ‘सरसेनापती हंबीरराव’ या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला होता.
-
प्रविण तरडेच्या पत्नीचे नाव स्नेहल आहे.
-
प्रविण तरडे यांची पत्नी स्नेहलसुद्धा अभिनेत्री आहे.
-
स्नेहलने ‘देऊळ बंद’, ‘चिंटू २’, ‘व्हेंटिलेटर’ यांसारख्या प्रसिद्ध चित्रपटात भूमिका साकारल्या आहेत.
-
‘सरसेनापती हंबीरराव’ चित्रपटात अभिनेत्री स्नेहल तरडे ‘सौ. लक्ष्मीबाई हंबीरराव मोहिते’ यांची भूमिका साकारणार आहेत.
-
स्नेहल यांनी प्रविण यांच्यासोबत काही नाटकांमध्ये कामसुद्धा केले आहे.
-
स्नेहल यांना अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
-
२ डिसेंबर २००९ साली प्रविण तरडे व स्नेहल यांनी लग्नगाठ बांधली.
-
प्रविण आणि स्नेहल यांना एक मुलगाही आहे.
-
‘सरसेनापती हंबीरराव’ या चित्रपटात मराठीतील अभिनेता गश्मीर महाजनी हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे.
-
छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज या दोन महान छत्रपतींच्या काळात स्वराज्याचे सरसेनापती होण्याचा बहुमान मिळालेले एकमेव सरसेनापती हंबीरराव मोहिते यांची व्यक्तिरेखा स्वत: प्रविण तरडे साकारत आहेत.
-
(सर्व फोटो सौजन्य : प्रविण तरडे / इन्स्टाग्राम)
