-
झी मराठीवर नुकतंच प्रेक्षकांच्या भेटीस आलेल्या ‘किचन कल्लाकार’ या कार्यक्रमाला प्रेक्षकांची पसंती मिळतेय.
-
किचन आणि कलाकार हे समीकरण जुळलेलं नसताना पाककलेच्या कसोटीला उतरलेल्या कलाकारांची उडणारी तारांबळ बघताना प्रेक्षकांना खूप मजा येतेय.
-
प्रेक्षक आपल्या लाडक्या कलाकारांना या कार्यक्रमात किचनमध्ये धावपळ करताना पाहतात पण या आठवड्यात त्यांच्या इवल्याश्या हाताने पदार्थ बनवून देणार आहेत.
-
अभिजित गुरु आणि समिधा गुरु यांची कन्या दुर्वा गुरु, ‘नाळ’ चित्रपटातील चैत्या म्हणजेच श्रीनिवास पोकळे आणि गायक मंगेश बोरगावकर यांची चिमुकली मीरा बोरगावकर किचन कल्लाकारच्या आगामी भागात सहभागी होणार आहेत.
-
ही बच्चेकंपनी किचनमध्ये तर कल्ला करणारच आहे पण त्यांची धमाल मजा मस्ती प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन करेल.
-
चिमुकली मीरा तिच्या बाबांना जर ते शाळेत जात असतील तर त्यांना आई म्हणून सूचना देताना प्रेक्षकांना पाहायला मिळेल.
-
इतकंच नव्हे तर मुलं आणि त्यांचे वडील यांच्यासोबत कार्यक्रमात मजेदार गेम्स देखील पाहायला मिळतील.
-
तेव्हा या ‘किचन कल्लाकार’च्या मंचावर कोण सगळ्यात जास्त छान पदार्थ बनवून महाराजांना खुश करणार आणि बच्चेकंपनी आपल्या निरागसतेने प्रेक्षकांचं मन कसं जिंकणार हे पाहायला मिळणार आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम)

तुमच्या इशाऱ्यानंतर कार्यकर्त्यांनी विधीमंडळात राडा केला? गोपीचंद पडळकर म्हणाले, “नितीन देशमुखला…”