-
सध्या ओटीटीचा जमाना आहे. अनेक नवनवीन वेब सीरिज प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी ओटीटीवर रिलीज होत आहेत.
-
‘मिर्झापूर’, ‘द फॅमिली मॅन’ यांसारख्या वेब सीरिजने प्रेक्षकांना वेडं करून सोडलं.
-
पण ओटीटीवर रिलीज होणाऱ्या या वेब सीरिज बनवण्यासाठी किती खर्च येतो, हे तुम्हाला ठाऊक आहे का?
-
अनेक बॉलिवूड आणि टॉलिवूडमधील चित्रपटांच्या बजेटची चर्चा नेहमी होताना दिसते.
-
परंतु, अशाही काही वेब सीरिज आहेत ज्यांनी बजेटच्या बाबतीत बॉलिवूडमधील चित्रपटांनादेखील मागे टाकलं आहे.
-
ओटीटीवर हिट ठरलेल्या अशा बिग बजेट वेब सीरिजबद्दल जाणून घेऊया.
-
मेड इन हेवन : ‘मेड इन हेवन’ ही वेब सीरिज अॅमेझॉन प्राइमवर २०१९ मध्ये रिलीज झाली होती.
-
या वेब सीरिजचे बजेट १०० कोटी रुपये इतकं होतं.
-
सेक्रेड गेम्स : नेटफ्लिक्सवरील ‘सेक्रेड गेम्स’ वेब सीरिजने चाहत्यांना अक्षरशः वेड लावलं होतं.
-
नवाजुद्दीन सिद्दीकी, सैफ अली खान, राधिका आपटे अशी स्टार कास्ट असलेल्या या वेब सीरिजचे दोन सीझन प्रदर्शित झाले आहेत.
-
या वेब सीरिजचे बजेटदेखील १०० कोटी रुपये इतकं होतं.
-
मिर्झापूर : ‘मिर्झापूर’ वेब सीरीजचा पहिला सीझन अॅमेझॉन प्राइमवर २०१८ मध्ये प्रदर्शित करण्यात आला होता.
-
अॅक्शन आणि क्राइमचा थरार असलेल्या या वेब सीरिजचे तीन सीझन प्रदर्शित करण्यात आले आहेत.
-
७० कोटी रुपये इतके ‘मिर्झापूर’ चे बजेट होते.
-
बार्ड ऑफ ब्लड : बॉलिवूड अभिनेता इमरान हाशमी मुख्य भूमिकेत असलेली ‘बार्ड ऑफ ब्लड’ ही वेब सीरिज नेटफ्लिक्सवर प्रदर्शित करण्यात आली होती.
-
या वेब सीरिजचे बजेट ६० कोटी रुपये इतकं होतं.
-
इनसाइड एज : अॅमेझॉन प्राइमवरील ‘इनसाइड एज’ ही वेब सीरिज क्रिकेटवर आधारित आहे.
-
या वेब सीरिजच्या पहिल्या सीझनचं बजेट ५० कोटी रुपये होतं.
-
ब्रीथ : ‘ब्रीथ’ या वेब सीरिजच्या दुसऱ्या सीझनमध्ये बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चन मुख्य भूमिकेत आहे.
-
२५ कोटी रुपये इतकं या वेब सीरिजचं बजेट होतं.
-
द फॅमिली मॅन : अॅमेझॉन प्राइमवरील सर्वाधिक चर्चेत राहिलेली वेब सीरिज म्हणजे ‘द फॅमिली मॅन’.
-
या वेब सीरिजचे दोन सीझन प्रदर्शित झाले आहेत.
-
या वेब सीरिजचे बजेट ३० कोटी रुपये इतकं होतं.
-
पाताललोक : ओटीटीवर सुपरहिट ठरलेल्या वेब सीरिजपैकी एक म्हणजे ‘पाताललोक’.
-
ही क्राइम सीरिजदेखील प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती.
-
२५ कोटी रुपये इतकं या वेब सीरिजचं बजेट होतं.
-
(सर्व फोटो : इंडियन एक्सप्रेस)

बापरे! बघता बघता अख्खा पूल गेला वाहून; गावकरी ओरडत राहिले अन्…पुराचा थरारक VIDEO पाहून धडकी भरेल