-
मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळी ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. प्राजक्ताने आतापर्यंत अनेक मालिकांमध्ये काम केले आहे.
-
सध्या प्राजक्ता ही ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करताना दिसते.
-
गेल्या काही दिवसांपासून प्राजक्ता ही ‘रानबाजार’ या बोल्ड वेबसीरिजमुळे चर्चेत आहे.
-
प्राजक्ता ही नेहमी तिच्या कुटुंबासोबत वेळ घालवताना दिसते.
-
नुकतंच प्राजक्ताने तिच्या भाचीसोबतचे काही फोटो शेअर केले आहेत.
-
याला तिने फार हटके कॅप्शन दिले आहे.
-
“उन्हाळ्याच्या सुट्टीत पोरं “मामाच्या गावाला” जातात; ही “आत्तूच्या शहरी” आलीए”., असे तिने कॅप्शन देताना म्हटले आहे.
-
“आजी आत्तूबरोबर एकटी दुबईला गेली होती म्हणून आजीला टूक टूक माकड करून ती आत्तूबरोबर एकटी मुंबईला आलीए. घ्या…”, असेही प्राजक्ता माळी म्हणाली.
-
“शूटींग, इव्हेंट, योगा क्लास सगळीकडे शेपूट बरोबर आहे…”, असेही तिने म्हटले.
-
आत्तूभाची #याज्ञसेनी #सूट्टी #जीवाचीमुंबई, असे हॅशटॅग तिने ही पोस्ट शेअर करताना दिले आहे.
-
प्राजक्ताने काही दिवसांपूर्वी तिच्या भाच्यांसोबत आंबे खातानाचा व्हिडीओ शेअर केला होता.
-
प्राजक्ताची ही पोस्ट सध्या चांगलीच व्हायरल होत आहे. या फोटोंवर अनेकांच्या लाइक्स आणि कमेंट्स पाहायला मिळत आहे.

मुंबईच्या रस्त्यावर फिरतोय भलामोठा अजगर; मुंबईकरांनो पावसाच्या पाण्यात चालताना सावधान! VIDEO पाहून घाम फुटेल