-
सध्या ओटीटीचा जमाना आहे. ओटीटीच्या माध्यमातून नवनवीन वेब सीरिज प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहेत.
-
हॉटस्टार, नेटफ्लिक्स, एमएक्स प्लेयरवरील अनेक वेब सीरिज प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल्या आहेत.
-
‘पंचायत’, ‘आश्रम’, ‘पाताल लोक’, ‘द फॅमिली मॅन’ या सीरिजला प्रेक्षकांकडून भरभरून प्रेम मिळालं.
-
काही कलाकारांना वेब सीरिजमधील भूमिकांमुळे विशेष ओळख मिळाली.
-
अनेक बॉलिवूड सेलिब्रिटीही ओटीटीपासून फार काळ स्वत:ला दूर ठेवू शकले नाहीत.
-
बॉलिवूड चित्रपटांप्रमाणेच वेब सीरिजसाठी कलाकारांनी घेतलेल्या मानधनाची देखील चर्चा होताना दिसतेय.
-
ओटीटीवरील वेब सीरिजसाठी सगळ्यात जास्त मानधन घेणाऱ्या कलाकारांवर एक नजर टाकूया.
-
‘सेक्रेड गेम्स’ या वेब सीरिजमधून बॉलिवूडचा नवाब सैफ अली खानने ओटीटीवर पदार्पण केलं.
-
या सीरिजमध्ये त्याने एका पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारली होती.
-
‘सेक्रेड गेम्स’चे दोन सीझन प्रदर्शित झाले असून यासाठी सैफ अली खानने १५ कोटी रुपये मानधन घेतले होते.
-
याच सीरिजमध्ये अभिनेता नवाजुद्दीन सिद्दिकी मुख्य भूमिकेत होता.
-
‘गणेश गायतोंडे’ ही भूमिका त्याने साकारली होती.
-
‘सेक्रेड गेम्स’च्या दोन्ही सीझनसाठी नवाजुद्दीनने १० कोटी रुपये मानधन घेतले होते.
-
अभिनेता पंकज त्रिपाठीची ‘मिर्झापूर’ वेब सीरिजमधील भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती.
-
या सीरिजचे दोन सीझन प्रदर्शित झाले असून यासाठी पंकज त्रिपाठीने १०कोटी रुपये मानधन घेतले होते.
-
याशिवाय तो ‘सेक्रेड गेम्स’च्या दुसऱ्या सीझनमध्येही दिसून आला होता. यासाठी त्याने १२ कोटी रुपये मानधन घेतले होते.
-
‘स्कॅम १९९२’ या वेब सीरिजमुळे प्रसिद्धीझोतात आलेला अभिनेता म्हणजे प्रतीक गांधी.
-
सीरिजमध्ये ‘हर्षद मेहता’ साकारण्यासाठी प्रतीकने प्रत्येक एपिसोडसाठी ५ लाख रुपये मानधन घेतले होते.
-
‘पंचायत’ वेब सीरिजमध्ये सचिव ही भूमिका साकारून नावारुपास आलेला अभिनेता म्हणजे जितेंद्र कुमार.
-
या सीरिजच्या दुसऱ्या सीझनमधील प्रत्येक एपिसोडसाठी त्याने ५० हजार रुपये मानधन घेतले होते.
-
‘आश्रम ३’ ही वेब सीरिज ओटीटीवर सध्या धुमाकूळ घालतेय.
-
बॉलिवूड अभिनेता बॉबी देओलने या सीरिजच्या माध्यमातून ओटीटीवर पदार्पण केलं.
-
या सीरिजमधील ‘बाबा निराला’ची भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस पडली.
-
मीडिया रिपोर्टनुसार, आश्रमच्या तिसऱ्या सीझनसाठी बॉबी देओलने १-४ कोटी रुपये मानधन घेतले आहे. (सर्व फोटो : इंडियन एक्सप्रेस)

१२ महिन्यांनंतर अखेर ‘या’ ३ राशींचं नशीब फळफळणार! शुक्र निर्माण करणार शक्तिशाली राजयोग; फक्त पैसाच नाही तर मिळेल मोठं यश