-
बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूर ही नेहमी तिच्या फॅशनसाठी ओळखली जाते. अभिनयासोबतच तिच्या ड्रेसिंग स्टाइलमुळे ती कायमच चर्चेत असते.
-
सोनम कपूर ही लवकरच आई होणार आहे. काही दिवसांपूर्वी तिच्या डोहाळे जेवणाचा कार्यक्रम पार पडला.
-
सोनम कपूरने २०१८ मध्ये आनंद अहुजाशी लग्नगाठ बांधली होती.
-
सोनम कपूर आणि आनंद आहुजाची पहिली भेट कशी झाली, त्यांची लव्हस्टोरी कशी सुरु झाली, त्यांचे नाते लग्नापर्यंत कसे पोहोचले, याबद्दल तिने खुलासा केला.
-
सोनम कपूरने एका मुलाखतीदरम्यान तिच्या आणि आनंदच्या पहिल्या भेटीबद्दल सांगितले.
-
त्यादरम्यान माझा ‘प्रेम रतन धन पायो’ हा चित्रपट प्रदर्शित होणार होता. तेव्हा मी त्या प्रमोशनमध्ये व्यग्र होती.
-
माझ्या काही मित्रांनी मला आनंदच्या मित्रासोबत डेटवर पाठवले होते. त्यावेळी मी पहिल्यांदा मी आनंद आहुजाला भेटली.
-
या डेटवेळी आनंद हा त्याच्या मित्रासोबत आला होता.
-
मी जेव्हा डेटसाठी पोहोचली. त्यावेळी मी आनंदसोबत बातचित केली. त्यावेळी आनंद हा मला माझा भाऊ हर्षप्रमाणे वाटला.
-
त्याच्या सवयी, आवड-निवड या सर्व गोष्टी हर्षसोबत मिळत्याजुळत्या होत्या.
-
यामुळे मी आनंदच्या मित्रासोबत डेट न करण्याचा निर्णय घेतला. यानंतर माझी आनंद आहुजासोबतच जवळीक वाढू लागली होती.
-
आम्ही तासनतास गप्पा मारायचो. रात्रभर एकमेकांशी चॅट करण्यात गुंतलेलो असायचो, असे सोनमने सांगितले.
-
विशेष म्हणजे अनिल कपूर हे सोनम कपूरचे वडील आहेत, याचा आनंद आहुजाला अंदाजही नव्हता. जेव्हा त्याला याबाबतची माहिती मिळाली तेव्हा तो आश्चर्यचकित झाला होता.
-
सोनम कपूर आणि आनंद आहुजा पहिल्या भेटीनंतर अनेकदा भेटू लागले. ते दोघेही प्रेमात आहेत, याची खबर त्यांच्या मित्रांनाही नव्हती.
-
सोनम कपूर २०१८ मध्ये आनंद आहुजासोबत विवाहबंधनात अडकली. त्यांचा विवाहसोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला.
-
तिच्या लग्नाचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.
-
दरम्यान सोनम कपूर आता लवकरच आई होणार आहे.
-
काही महिन्यांपूर्वी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत तिने याबाबतची माहिती दिली होती. (सर्व फोटो- सोनम कपूर/ इन्स्टाग्राम)

पाकिस्तानचा भारताविरोधात OIC मध्ये प्रस्ताव आणण्याचा प्रयत्न; तीन मुस्लीम राष्ट्रांचा विरोध