-
मराठी चित्रपटसृष्टीतील हॅंडसम हंक अशी ओळख असलेला अभिनेता गश्मीर महाजनी सध्या चर्चेत आहे.
-
गश्मीरने आजवर अनेक चित्रपटांतून प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे.
-
अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडणारा गश्मीर लवकरच एका वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे.
-
झी मराठीवरील ‘डान्स महाराष्ट्र डान्स लिटिल मास्टर्स’ या कार्यक्रमात गश्मीर पहिल्यांदाच परिक्षकाच्या खूर्चीत बसणार आहे.
-
गश्मीर अभिनेत्यासोबतच उत्तम डान्सर आणि कोरिओग्राफरही आहे.
-
या नवीन भूमिकेबद्दल गश्मीर म्हणाला, “हा माझा पहिलाच डान्स रिअॅलिटी शो आहे. शोमध्ये परिक्षकाच्या भूमिकेत असल्याचा मला खूप आनंद आहे. माझं लहान मुलांसोबत खूप छान जुळतं. म्हणूनच मी या शोमधील परिक्षकाची भूमिका स्वीकारली.”
-
पुढे गश्मीर म्हणाला, “एका अभिनेत्यापलीकडे मी एक उत्तम डान्सर आणि कोरिओग्राफर आहे हे संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे. त्यामुळे मला अनेकदा डान्सशी निगडित काही करणार आहे का? याबद्दल विचारणा व्हायची. यानिमित्ताने प्रेक्षकांची ही इच्छादेखील पूर्ण करत असल्याचा मला आनंद आहे.”
-
‘डान्स महाराष्ट्र डान्स लिटिल मास्टर्स’ कार्यक्रमातून प्रेक्षकांचं भरगोस मनोरंजन करणार असल्याचं देखील गश्मीरने सांगितले.
-
या शोमध्ये परिक्षणासोबतच गश्मीर कधीतरी गाण्यावर थिरकताना आणि डान्सशी संबंधित बोलतानादेखील दिसणार आहे.
-
‘डान्स महाराष्ट्र डान्स लिटिल मास्टर्स’ शोमध्ये गश्मीरला परिक्षक म्हणून पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.
-
झी मराठीवर २७ जुलै पासून बुधवार आणि गुरुवार रात्री ९.३० वाजता या कार्यक्रमाचे प्रक्षेपण होणार आहे.
-
(सर्व फोटो : गश्मीर महाजनी/ इन्स्टाग्राम)

बाबा वेंगा यांच्या भविष्यवाणीनुसार लवकरच ‘या’ राशींचा सुरु होणार सुवर्णकाळ? डिसेंबर २०२५ पर्यंत होऊ शकतात गडगंज श्रीमंत