-
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका म्हणून ‘मन उडू उडू झालं’ या मालिकेकडे पाहिले जाते. सध्या ही मालिका चांगलीच लोकप्रिय ठरताना दिसत आहे.
-
या मालिकेत इंद्रा आणि दिपूची हटके लव्हस्टोरी प्रेक्षकांना चांगलीच भावली होती.
-
लवकरच ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार असून सध्या या मालिकेत इंद्रा आणि दिपू लग्नाचा ट्रॅक पाहायला मिळत आहे.
-
या मालिकेतील इंद्रा आणि दीपू हे दोघेही नुकतंच विवाहबंधनात अडकले आहेत.
-
त्यांच्या लग्नाचे अनेक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
-
इंद्रा आणि दीपूने आपल्या प्रेमासाठी अनेक अग्निपरीक्षा दिल्या आहेत.
-
अनेक संकटांवर मात करत अखेर ते दोघेही लग्नाच्या बंधनात अडकणार असल्याचे दिसत आहे.
-
इंद्रा आणि दीपू दोघेही आपल्या लग्नासाठी फारच उत्साही असल्याचे दिसत आहेत.
-
दीपूने या लग्नासाठी खास लाल रंगाची कांजीवरम साडी परिधान केली होती.
-
तर इंद्रानेही लुंगी आणि कुर्ता परिधान केला आहे.
-
या दोघांनीही लग्नासाठी खास दाक्षिणात्य लूक केल्याचे दिसून येत आहे.
-
यासोबत या फोटोंमध्ये देशपांडे कुटुंबियही छान लूकमध्ये पाहायला मिळत आहे.
-
दीपू आणि इंद्राच्या लग्नातील त्यांचा कौटुंबिक फोटोदेखील समोर आला आहे.
-
या फोटोत दीपू आणि इंद्राचे संपूर्ण कुटुंब दिसत आहे.
-
यानंतर आता ही मालिका आता प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. या मालिकेच्या जागी आता नवी मालिका प्रसारित होणार आहे. ‘तू चाल पुढं’ असे या नव्या मालिकेचे नाव आहे. ही नवीन मालिका येत्या १५ ऑगस्टला प्रदर्शित होत आहे. (सर्व फोटो – झी मराठी/ फेसबुक)

Video : फ्लाइट कॅप्टन भाचीकडून विमानात खास उद्घोषणा! पद्मश्री अशोक सराफ यांचं केलं अभिनंदन; म्हणाली, “माझे काका…”