-
छोट्या पडद्यावरील वादग्रस्त कार्यक्रम म्हणून ‘बिग बॉस’ या कार्यक्रमाकडे पाहिलं जातं.
-
‘बिग बॉस मराठी’ हा शो लोकप्रिय शोपैकी एक आहे.‘बिग बॉस मराठी’चे तीनही पर्व चांगलेच गाजले होते.
-
बिग बॉसच्या स्पर्धकांमधील राडे, नवनवीन टास्क, मैत्री आणि होणारे वाद यामुळे हा शो कायमच चर्चेत राहिला आहे.
-
बिग बॉसचे तीनही पर्व हिट ठरल्यानंतर आता लवकरच चौथे पर्व प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. काही दिवसांपूर्वी या शोचा टीझर प्रदर्शित करण्यात झाला होता.
-
त्यानंतर आता बिग बॉस मराठीच्या चौथ्या पर्वासाठी चर्चेत असलेल्या विविध स्पर्धकांना विचारणा करण्यात येत आहे.
-
मात्र यातील काही स्पर्धकांनी बिग बॉसच्या चौथ्या पर्वात सहभागी होण्यास नकार दिला आहे. यात अनेक प्रसिद्ध कलाकारंच्या नावाचा समावेश आहे.
-
बिग बॉसच्या घरात प्रवेश करण्यास नकार देणाऱ्या कलाकारांमध्ये पहिले नाव अभिनेत्री केतकी चितळे हिचे आहे. केतकी ही गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चर्चेत आहे.
-
मराठी मालिकांमध्ये काम करणारी अभिनेत्री केतकी चितळे वादग्रस्त विधानांमुळे अनेकदा वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. काही दिवसांपूर्वी तिने तिच्या फेसबुकवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविरोधात वादग्रस्त पोस्ट शेअर केली होती. या प्रकरणी केतकीला अटक करण्यात आली.
-
केतकीला बिग बॉससाठी अनेकदा विचारणा झाली होती. मात्र तिने त्यासाठी स्पष्ट नकार दिला आहे. “मी माझ्या आयुष्यात कधीही अशाप्रकारच्या रिअॅलिटी शोचा भाग होणार नाही”, असे तिने ई-टाईम्सशी बोलताना सांगितले होते.
-
छोट्या पडद्यावरील पहिली ट्रान्सजेंडर अभिनेत्री गंगा यांनाही बिग बॉस मराठीसाठी संपर्क साधण्यात आला होता. प्रणित हाटेपासून गंगापर्यंतचा हा प्रवास अनेकांसाठी लक्षवेधी ठरला होता.
-
“मला बिग बॉसच्या टीमकडून स्पर्धेत सहभागी होण्यासाठी फोन आला होता. त्यानंतर आमच्यात काही चर्चा झाल्या. पण नंतर त्यापुढे मला काहीही अपडेट मिळाले नाही”, असे गंगाने सांगितले.
-
‘लागिर झालं जी’ या मालिकेतून प्रसिद्धीझोतात आलेली अभिनेत्री शिवानी बावकर हिलादेखील या शोसाठी संपर्क साधण्यात आला होता.
-
पण बिग बॉसच्या करारावरील अटी आणि शर्ती पाहून तिने एक पाऊल मागे घेतले. त्यामुळे तिने यासाठी नकार दिला असल्याचे बोललं जात आहे.
-
‘रात्रीस खेळ चाले’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली ‘शेवंता’ फेम अभिनेत्री अपूर्वा नेमळेकरनेही नकार दिला आहे.
-
काही दिवसांपूर्वी अपूर्वाने चाहत्यांशी संवाद साधताना बिग बॉसमध्ये सहभागी होण्याबद्दल स्पष्टीकरण दिले होते. यावेळी ती म्हणाली, “याबाबत मी आता नक्की काहीही सांगू शकत नाही. मी एक अभिनेत्री आहे. मला फक्त वेगवेगळ्या व्यक्तीरेखा साकारण्यात रस आहे.”
-
मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळी ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. प्राजक्ता ही महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करत आहे.
-
तिला बिग बॉसच्या चौथ्या पर्वात सहभागी होण्याबद्दल विचारणा झाली होती. पण तिने यासाठी स्पष्ट नकार दिला होता.
-
“बिग बॉस सारख्या रिअॅलिटी शोसाठी मी मिसफिट आहे आणि मी १०० दिवस बंद घरात राहू शकत नाही”, असे तिने ई-टाईम्सशी बोलताना सांगितले.

Pakistan On US : पाकिस्तानची नवी खेळी, थेट अमेरिकेला दिली ‘ही’ मोठी ऑफर; भारतावर काय परिणाम होणार?