-
‘झी मराठी’वर नुकत्याच सुरू झालेल्या ‘बस बाई बस’ या कार्यक्रमाची सध्या सोशल मीडियावर बरीच चर्चा आहे.
-
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) या ‘बस बाई बस’च्या पुढील भागामध्ये हजेरी लावली आहे.
-
यावेळी त्यांना “तुम्ही प्लास्टिक सर्जरी केली आहे का?” हा प्रश्न अमृता यांना विचारण्यात आला.
-
तेव्हा त्या म्हणाल्या, “चांगलं झालं तुम्ही हा प्रश्न मला विचारला. याबाबत मला अनेक लोकांनी ट्रोल देखील केलं आहे. प्लास्टिक सर्जरी करण्यासाठी खूप किंमत मोजावी लागते. याचा आणखी एक तोटा म्हणजे एकदा का चेहरा बिघडला की भविष्यकाळात तुम्हाला अडचण निर्माण होते.”
-
“एक सांगते मी लग्नाआधी ब्युटी पार्लरला देखील जायचे नाही. त्यानंतरही लग्नामध्ये मेकअप करतात तोच मी केला होता. देवेंद्रजी पण असे आहेत की ते स्त्रीचा चेहरा नव्हे तर मन पाहतात.”
-
पुढे त्या म्हणाल्या, “चांगलं दिसता यावं म्हणून मी फक्त पार्लमध्ये जाऊन काही ट्रिटमेंट घेतल्या. म्हणजे फेशियल नियमित केलं. योगासनं मी नियमित करते. दिग्विजा जेव्हा झाली तेव्हा माझं वजन वाढलं होते. ते मी कमी केलं. तसंच मोजकंच मी खायचे.”
-
“दर महिन्याला मेकअपसाठी किती पैसे खर्च करता?” असा प्रश्न यावेळी अमृता यांना विचारण्यात आला.
-
या प्रश्नाला उत्तर देत त्या म्हणाल्या, “हे बघा मी झी मराठीच्या कार्यक्रमाला आली आहे तर झीने माझ्या मेकअपसाठी खर्च केला. ज्याचा कार्यक्रम त्याचाच मेकअप.” असं गंमतीशीर पद्धतीने अमृता यांनी सांगितलं.
-
अमृता यांना गाण्याची प्रचंड आवड आहे.
-
त्यांचे अनेक म्युझिक अल्बम देखील प्रदर्शित होतात. शिवाय वेगवेगळ्या लूकमधील फोटो त्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे शेअर करताना दिसतात.
-
‘बस बाई बस’मधील त्यांचा हा भाग अधिक चर्चेत आहे. (सर्व फोटो – इन्स्टाग्राम)

करिष्मा हगवणेची महिला आयोगाकडे तक्रार; चाकणकरांनी काय सांगितलं? Vaishnavi Hagwane Case