-
सध्या सोशल मीडियावर ‘इमर्जन्सी’ (Emergency) या चित्रपटाची चर्चा सुरु आहे.
-
माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी २५ जून १९७५ साली देशात आणीबाणी लागू केली होती.
-
यावर आधारित बॉलिवूडचा बहुचर्चित ‘इमर्जन्सी’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
-
या चित्रपटात अभिनेत्री कंगना रणौत माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या भूमिकेत दिसणार आहे.
-
मराठमोळा अभिनेता श्रेयस तळपदे या चित्रपटात भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांची भूमिका साकारताना दिसणार आहे.
-
अभिनेत्री महिमा चौधरी या चित्रपाटात पुपुल जयकर यांची भूमिका साकारताना दिसणार आहेत.
-
या चित्रपटात अभिनेते अनुपम खेर जयप्रकाश नारायण यांच्या भूमिकेत दिसणार आहे.
-
अभिनेता मिलिंद सोमण या चित्रपटात सॅम मानेकशॉ यांची साकारताना दिसणार आहेत.
-
‘इमर्जन्सी’ या चित्रपटाची निर्मिती कंगना रणौतने केली आहे.
-
कंगनाने माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या भूमिकेसाठी बरीच मेहनत घेतली असल्याचे टीझरमधूनच स्पष्टपणे दिसून येत आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : कंगना रणौत / इन्स्टाग्राम)

VIDEO: “खूप आवडते मला ती, पण…” काकांनी लिहिलेली पुणेरी पाटी वाचायला लोकांची गर्दी; शेवटची ओळ ऐकून पोट धरुन हसाल