-
‘सुखं म्हणजे नक्की काय असतं!’ या मालिकेत देवकीची भूमिका साकारणारी अभिनेत्री मिनाक्षी राठोड ही कायम विविध कारणांमुळे चर्चेत असते.
-
मिनाक्षी राठोडने काही महिन्यांपूर्वी एका गोड मुलीला जन्म दिला. मिनाक्षी आणि अभिनेता कैलास वाघमारे यांना कन्यारत्न प्राप्त झाले आहे.
-
त्यानंतर आता त्यांच्या लेकीचा नामकरण विधी पार पडला आहे.
-
मिनाक्षी आणि कैलासला १० मे २०२२ रोजी कन्यारत्न प्राप्त झाले. त्यानंतर आता चार महिन्यांनी मिनाक्षी आणि कैलासने त्यांच्या बाळाचे नाव ठेवले आहे.
-
मिनाक्षी राठोडने नुकतंच इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे.
-
यात तिने तिच्या लेकीच्या नामकरण विधीच्या सोहळ्याचे काही फोटो शेअर केले आहेत.
-
मिनाक्षी आणि कैलासने त्यांच्या लेकीचे नाव ‘यारा’ असे ठेवले आहे.
-
फोटो शेअर करताना दिलेल्या कॅप्शनमध्ये त्यांनी याबाबतचा खुलासा केला आहे.
-
त्यांच्या लेकीचे नाव फारच वेगळे असून त्याचा अर्थही फारच खास आहे.
-
‘यारा’ या नावाचा अर्थ ‘लहान फुलपाखरु’ किंवा ‘वॉटर लेडी’ असा होता.
-
अभिनेत्री मिनाक्षी राठोड ही ‘सुखं म्हणजे नक्की काय असतं!’ या मालिकेत देवकीची भूमिका साकारत होती.
-
तिने प्रेग्नेंसीच्या काळातही मालिकेचे शूट केले होते. सध्या तिने या मालिकेतून ब्रेक घेतला आहे.
-
मिनाक्षीचा पती कैलास वाघमारे हा देखील एक अभिनेता आहे.
-
कैलासने ‘तान्हाजी’ या चित्रपटात चुलत्याची भूमिका साकारली होती.
-
या चित्रपटातील त्याच्या भूमिकेमुळे तो घराघरात प्रसिद्ध झाला.

HSC Result 2025 Maharashtra Board, mahresult.nic.in : बारावीचा निकाल जाहीर; गुण पडताळणी आणि पुनर्मूल्यांकनासाठी २० मे पर्यंत मुदत