-
बॉलिवूड अभिनेत्री रिचा चड्ढा आणि अभिनेता अली फजल हे बऱ्याच महिन्यांपासून एकमेकांना डेट करत होते.
-
सोशल मिडियावर यांच्या लग्नाविषयी चांगलीच चर्चा होती.
-
त्यांनी नुकतेच काही फोटोज सोशल मीडिया अकाऊंटवरून शेअर केले आहेत.
-
या फोटोजमध्ये दोघेही त्यांच्या स्टायलिश अवतारात अगदी शोभून दिसत आहेत.
-
रिचा ही बॉलिवूडमधील आघाडीची अभिनेत्री आहे. अनुराग कश्यपच्या ‘गॅंग्स ऑफ वासेपूर’मुळे तिला खरी ओळख मिळाली.
-
अली फजल हा बॉलिवूडप्रमाणेच हॉलिवूडच्याही मोठ्या चित्रपटात झळकला आहे. शिवाय ‘मिर्झापुर’ सीरिजमुळे त्याला प्रचंड लोकप्रियता मिळाली आहे.
-
रिचा आणि अली आता लवकरच लग्नबंधनात अडकणार असून त्यासाठी सगळी तयारीदेखील झाली आहे.
-
मीडिया रीपोर्टनुसार अली आणि रिचा यांचं लग्न दिल्लीमधील लोकप्रिय जिमखाना क्लबमध्ये होणार आहे.
-
दिल्ली जिमखाना क्लब हा १९१३ साली स्थापन करण्यात आला होता. त्यामुळे याला एक ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे.
-
दिग्गज उद्योगपति आणि सेलिब्रिटीज या क्लबचे सदस्यदेखील आहेत.
-
१०९ वर्षं जुनी वास्तु ही अत्यंत भव्य आहे आणि याचठिकाणी रिचा आणि अली यांचा लग्नसमारंभ पार पडणार आहे.
-
या क्लबमध्ये उत्तमोत्तम सोयी सुविधा दिलेल्या आहेत. लग्नानंतर रिचा आणि अली मुंबईत मोठी रिसेप्शन पार्टीदेखील देणार आहेत. (फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम आणि दिल्ली जिमखाना क्लब साईट)

भर बसस्थानकात तरुणाचं घाणेरडं कृत्य! महिलांसमोर जाऊन बसला अन्…, VIDEO पाहून नेटकरी म्हणाले, “अशांना चोपलंच पाहिजे”