-
बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक म्हणून ओळखली जाते.
-
तिने अभिनयाच्या जोरावर अल्पावधीतच चित्रपटसृष्टीत स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केले. पण सध्या मात्र ती सिनेसृष्टीपासून दूर आहे.
-
गरोदरपण आणि मुलीच्या संगोपनासाठी सिनेसृष्टीतून ब्रेक घेतलेली अनुष्का सोशल मीडियावर कायमच सक्रिय असल्याचे पाहायला मिळते.
-
ती सोशल मीडियावर विविध फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहते.
-
नुकतंच अनुष्काने तिचे नो मेकअप लूकमधील काही फोटो शेअर केले आहेत.
-
तिने शेअर केलेल्या या फोटोंवर तिच्या एक्स बॉयफ्रेंडने कमेंट केली आहे.
-
अनुष्काने शेअर केलेल्या या फोटोत ती तिच्या व्हॅनिटी व्हॅनसमोर उभी असल्याचे पाहायला मिळत आहे.
-
यावेळी तिने हुडी आणि ट्राऊजर परिधान केली आहे. त्यासोबत तिने काळ्या रंगाचे शूजही घातले आहेत.
-
यात तिने विविध पोज देत फोटो काढले आहेत. यावेळी तिच्या अदा कॅमेऱ्यात कैद झाल्या आहेत.
-
अनुष्काने तिच्या या फोटोला फार मजेशीर कॅप्शन दिले आहे.
-
“मला यातील एकही फोटो आवडलेला नाही. पण नंतर मी विचार केला की नेहमी चांगले फोटो पोस्ट करायचे हे कोणी सांगितलं आहे.”
-
“त्यामुळेच मी माझे जरा ओके ओके टाइप दिसणारे फोटो पोस्ट केलेत.”
-
“हे फोटो कदाचित मी शेअर केले नसते, पण ते काढण्यासाठी मी माझे अनमोल वेळ खर्च केला आहे.”
-
“त्यामुळे ते पोस्ट करणं गरजेचे आहे, चला ओके बाय”, असे अनुष्का शर्माने म्हटले आहे.
-
अनुष्का शर्माच्या या पोस्टवर अनेक कलाकारांनी प्रतिक्रिया दिली आहे.
-
अभिनेता रणवीर सिंहने देखील तिच्या या फोटोवर कमेंट केली आहे. रणवीरने कमेंट करताना हसतानाचा इमोजी शेअर केला आहे.
-
तर अर्जुन कपूरच्या कमेंटने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. हुडी चांगला आहे. पण फोटो खराब आहे, याबद्दल मी सहमत आहे, असे अर्जुन कपूर म्हणाला.

Video : जेव्हा भारतीय तरुणी जपानच्या रस्त्यावर साडी नेसून फिरते…; पाहा, जपानी लोकांच्या प्रतिक्रिया