-
करीना कपूर-खान बॉलिवूडमधल्या सर्वात्कृष्ट अभिनेत्रींपैकी एक आहे. ती सोशल मीडियावर फार सक्रिय आहे. तिने नुकतेच इन्स्टाग्रामवर काही फोटो पोस्ट केले आहेत.
-
करीनाने शेअर केलेले फोटो तिच्या व्हॅनिटी व्हॅनमधले असून त्या फोटोंवरुन ती आणि तिची टीम व्हॅनिटीमध्ये पार्टी करत होते असे लक्षात येते.
-
करीनाचा मेकअप करणारे मेकअप आर्टिस्ट मिकी कॉन्ट्रॅक्टर साउथ इंडियन पदार्थ खाताना.
-
करीना कपूरच्या व्हॅनिटी व्हॅनमध्ये अनेक अद्ययावत सुविधा आहेत.
-
करीना आणि करिष्मा या दोघी खाण्याच्या शौकीन आहेत. त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे खाद्यपदार्थ खायला आवडतात.
-
ऑगस्ट महिन्यामध्ये आमिर खान आणि करीना कपूर खान यांचा ‘लाल सिंग चड्ढा’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता.
-
या चित्रपटामध्ये तिने ‘रुपा डीसूझा’ हे पात्र साकारले होते.
-
चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या दरम्यान ती तिच्या धाकट्या मुलाला, जेहला अनेकदा सेटवर आणायची.
-
लाल सिंग चड्ढा चित्रपटाचे शूटींग सुरु असतानाचा फोटो. (सर्व फोटो – Instagram/Kareena Kapoor Khan)

“ED बद्दल महाराष्ट्रात वाईट अनुभव, आता…”, सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे; सरन्यायाधीश म्हणाले, “तोंड उघडायला लावू नका, अन्यथा…”