-
मध्यंतरी किशोर कुमार यांचा बंगला क्रिकेटर विराट कोहलीने भाड्यावर घेतला असून तो तिथे एक हॉटेल सुरू करणार असल्याची बातमी समोर आली होती.
-
नुकताच विराटने या हॉटेलची सफर करून आणणारा एक व्हिडिओ त्याच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर केला आहे. अभिनेता मनीष पॉल याने विराटच्या या हॉटेलला भेट दिली आणि त्यानिमित्त खास त्याच्याशी गप्पा मारल्या.
-
या मुलाखतीदरम्यान या दोघांनी एकमेकांशी भरपूर गप्पा मारल्या.
-
आलिशान हॉटेल विराटने जुहू परिसरात सुरू केलं आहे.
-
या व्हिडिओमध्ये त्याने हॉटेलची एक छोटीशी झलक दाखवली आहे.
-
विराट लहानपणीपासूनच किशोर कुमार यांचा चाहता होता.
-
त्यांच्या घरात स्वतःचं हॉटेल उभं करणं ही विराटसाठी एखाद्या स्वप्नापेक्षा कमी नाही हे त्याने या व्हिडिओमध्ये कबूलही केलं.
-
या व्हिडिओमध्ये विराट आणि मनीष यांनी तिथल्या पदार्थांचाही आस्वाद घेतला.
-
याच काही पदार्थांची झलक आपल्याला या व्हिडिओमध्ये बघायला मिळते.
-
विराटच्या या हॉटेलचं नाव आहे ‘वन८ कॉम्युन’.
-
हे विराटचं पहिलं हॉटेल नाही. दिल्ली, कलकत्ता, पुणे या शहरतही विराटची हॉटेल्स आहेत.
-
या व्हिडिओमध्ये या दोघांनी धमाल गप्पा मारल्या आणि विराटने त्याच्या जुहूमधील या हॉटेलला भेट देण्याची विनंतीदेखील केली आहे. (फोटो सौजन्य : विराट कोहळी / इन्स्टाग्राम)

Video : फ्लाइट कॅप्टन भाचीकडून विमानात खास उद्घोषणा! पद्मश्री अशोक सराफ यांचं केलं अभिनंदन; म्हणाली, “माझे काका…”