-
‘सारेगमप लिटिल चॅम्प’ या कार्यक्रमामुळे गायिका कार्तिकी गायकवाड नावारुपाला आली.
-
डिसेंबर २०२०मध्ये कार्तिकीचा विवाहसोहळा थाटामाटात पार पडला.
-
तिने व्यावसायिक रोनित पिसेशी लग्नगाठ बांधली आणि सगळ्यांना सुखद धक्काच दिला.
-
रोनित तसेच कार्तिकी एकमेकांबरोबरचे बरेच फोटो सोशल मीडियाद्वारे शेअर करताना दिसतात.
-
आता कार्तिकी तिच्या पतीसह जेजुरीला खंडेरायाच्या दर्शनाला गेली होती.
-
यादरम्यानचे काही फोटो रोनितने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे शेअर केले आहेत.
-
या फोटोंमध्ये कार्तिकीसह रोनितचे आई-वडीलही दिसत आहेत.
-
तसेच एका फोटोमध्ये कार्तिकीच्या नवऱ्याने खंडा तलवार उचलल्याचं दिसून येत आहे.
-
खंडेरायाची ४२ किलो वजनाची खंडा तलवार साऱ्यांनाच ठाऊक आहे.
-
जेजुरी गडावर खंडेरायाचं दर्शन घेतल्यानंतर हीच खंडा तलवार रोनितने उचलली. तसेच यळकोट यळकोट जय मल्हारचा जयघोष केला.
-
(सर्व फोटो – इन्स्टाग्राम)

पावसाच्या अतिवेगाने शास्त्रज्ञही अवाक्