-
अभिनेत्री रेखा यांचा भानूरेखा गणेशन ते रेखा हा प्रवास आपल्या सगळ्यांना ठाऊक आहेच.
-
रेखा यांच्या सौंदर्याची जितकी प्रशंसा केली जाते तितकीच त्यांच्या खासगी आयुष्याचीही चर्चा होते. इतकी वर्षे उलटून गेली तरी अजूनही लोकांना रेखा यांच्या आयुष्याबद्दल कुतूहल आहे.
-
बॉलिवूडच्या या ‘उमराव जान’वर आजही प्रेक्षक आपला जीव ओवाळून टाकतात.
-
रेखा आणि अमिताभ हे समीकरण आजही लोकं विसरलेले नाहीत. या नात्यात बरेच अडथळेदेखील आले. त्याबद्दल लोकांनी प्रचंड गॉसिपही केलं.
-
पण त्यांच्या नात्याचा हा ‘सिलसिला’ फार काळ चालला नाही आणि अखेर अमिताभ यांनी जया बच्चन यांच्यासोबत संसार थाटला.
-
रेखा यांचं वैयक्तिक जीवन फारच गूढ होतं, वैवाहिक सुख त्यांना कधीच मिळालं नसलं तरी पडद्यावर मात्र बच्चन, राज बब्बर, विनोद मेहरा ते थेट अक्षय कुमारपर्यंत कित्येक कलाकारांबरोबर त्यांच्या केमिस्ट्रिची खूप चर्चा झाली.
-
रेखा या सध्या चित्रपटसृष्टीत काम करत नसल्या तरी त्या एवढी सुंदर जीवनशैली मेंटेन कशी ठेवतात. याविषयी बऱ्याच जणांना कुतूहल आहे. आज त्याचबद्दल आपण जाणून घेणार आहोत.
-
रेखा आणि त्यांच्या कुटुंबाच्या नावावर मुंबई आणि दक्षिण भारतात बरीच प्रॉपर्टी आहे. त्या प्रॉपर्टीमधून भाड्याची एक मोठी रक्कम रेखा यांना मिळते.
-
रेखा यांना राज्यसभेचं सदस्य म्हणून नेमलं असल्यामुळे तिथूनही त्यांना चांगला पगार मिळतो असं म्हंटलं जातं. हा पगार तब्बल १२ लाख असल्याचं म्हंटलं जातं.
-
याबरोबरच रेखा बऱ्याच चित्रपटात पाहुण्यां कलाकार म्हणून झळकतात आणि असं म्हंटलं जातं की त्यासाठी त्यांचं मानधन हे चांगलंच तगडं असतं.
-
रेखा बचत करण्यावर खूप भर देतात. त्या कधीच महागडे डिझायनर कपडे परिधान करत नाही किंवा दिखावा करत नाहीत. कमी वयातच चित्रपटातून पैसे मिळायला लागल्यापासून रेखा यांनी स्वतःसाठी चांगली रक्कम बाजूला काढून ठेवली आहे आणि तीच रक्कम आज त्यांना उपयोगी पडत आहे.
-
याबरोबरच रेखा यांना काही ब्रॅंड एन्डोर्समेंटमधून चांगली रक्कम मिळते. शिवाय काही रीयालिटि शोमध्ये रेखा यांनी परीक्षक म्हणून भूमिका निभावली आहे त्यासाठीदेखील रेखा चांगलं मानधन घेतात. (फोटो सौजन्य : इंडियन एक्सप्रेस आणि फेसबुक)

Asia Cup 2025: पाकिस्तानचा बहिष्कार! IND vs PAK सामन्याआधी PCB ने घेतला मोठा निर्णय