-
झी मराठीवरील माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेतील शेफाली पात्राने अल्पावधीतच प्रेक्षकांचे मन जिंकले आहे.
-
शेफाली म्हणजेच अभिनेत्री काजल काटे सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते.
-
ती नेहमी वेगवेगळ्या पद्धतीचे फोटोशूट करत असते.
-
अभिनेत्री काजल काटे हिने नुकतंच एक फोटोशूट केलं आहे. ज्यात ती भाजीवली बनली आहे.
-
या फोटोंमध्ये ती चक्क भाजी विकताना दिसत आहे.
-
तिचे हे फोटो पाहून तिने मालिका सोडली की काय असा चर्चा होताना दिसत आहे.
-
मात्र असे नसून तिच्या नवीन कामाचं फोटोशूट असल्याचं म्हटलं जातंय.
-
काजल हिने या फोटोशूट दरम्यान काळी साडी, नाकात नथ, बांगड्या, मंगळसूत्र घालून बाजारातील मंडईत जाऊन फोटोशूट केलंय.
-
मात्र, या फोटोशूट दरम्यान तिने घातलेला सिव्हलेस ब्लाऊज नेटकाऱ्यांना खटकत आहे.
-
‘प्रॉपर ड्रेस हवा होता छान दिसली असतीस तरी हे सिव्हलेस नकली वाटते’, अशी कमेंट एका नेटकऱ्याकडून आली आहे.
-
तर अनेकांनी काजलच्या या भाजीवाली बनलेल्या लुकचं कौतुक केलं आहे.
-
अभिनेत्री काजलचे हे नवीन फोटोशूट सोशल मीडियावर चांगलंच चर्चेत आहे.(All photos: instagram)

Raj Thackeray : “६ जुलैला मुंबईत मोर्चा, त्यात एकही झेंडा…”, राज ठाकरेंनी केलं जाहीर; मराठीच्या मुद्द्यावर म्हणाले, “सरकारला एकदा कळू देत की…”