-    प्लॅनेट मराठी प्रस्तुत ‘अथांग’ वेब सीरिजचा लॉन्चिंग सोहळा नुकताच पार पडला. 
-    या सोहळ्याला मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी उपस्थिती दर्शविली. 
-    मराठमोळी अभिनेत्री तेजस्विनी पंडीतने या सोहळ्यात राज ठाकरेंची मुलाखत घेतली. 
-    राज ठाकरेंचं मनोरंजनसृष्टी व चित्रपटांवर किती प्रेम आहे, हे त्यांनी अनेकदा त्यांच्या मुलाखतीतून सांगितलं आहे. 
-    यावेळी त्यांनी मनोरंजनसृष्टीतील अनेक विषयांवर भाष्यही केलं. 
-    “दिग्दर्शन क्षेत्रात पाऊल टाकणार का?” असा प्रश्न तेजस्विनी पंडितने राज ठाकरेंना विचारला. 
-    यावर राज ठाकरेंनी उत्तर देत “मी राजकारणामध्ये खूप अपघाताने आलो. माझं पाहिलं पॅशन हे फिल्म मेकिंग (चित्रपट निर्मिती) हे आहे”, असं म्हणाले. 
-    पुढे ते म्हणाले, “त्यामुळे चित्रपट मी त्या दृष्टिकोनातून पाहतो. मी बरेचसे मराठी चित्रपट पाहत असताना मला खूप घाईगडबडीत केल्यासारखे वाटतात”. 
-    “छत्रपती शिवाजी महाराजांवर चित्रपट काढायचा आहे. पण आता इतके चित्रपट येऊन गेलेत की माझी हिंमतच होत नाही”, असंही ते म्हणाले. 
-    “कॉलेजमध्ये असताना मी ‘गांधी’ चित्रपट पाहायचो. तेव्हा मला वाटायचं की छत्रपती शिवाजीमहाराजांवर इतका मोठा चित्रपट बनवला गेला पाहिजे”, असंही ते पुढे म्हणाले. 
-    यानंतर राज ठाकरेंनी छत्रपती शिवाजीमहाराजांवर चित्रपट काढणार असल्याची घोषणा केली. 
-    ते म्हणाले, “छत्रपती शिवाजीमहाराज यांच्यावर चित्रपट काढण्याच्या तयारीत मी आहे. माझं काम सुरू आहे”. 
-    “छत्रपती शिवाजीमहाराजांवर सिनेमा काढणार असून तो तीन भागांत प्रदर्शित करण्यात येईल”, असंही ते म्हणाले. 
-    (सर्व फोटो: प्लॅनेट मराठी/ इन्स्टाग्राम, इंडियन एक्सप्रेस) 
 
  Diwali 2026 Date : २०२६ मध्ये तब्बल सात दिवस साजरा केला जाणार दिवाळसण, ‘या’ दिवशी असेल लक्ष्मीपूजन, भाऊबीज 
   
  
  
  
  
  
   
   
   
   
   
   
  