-    छोट्या पडद्यावरील बिग बॉस मराठी हा कार्यक्रम कायमच चर्चेत असतो. या कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या अनेक सदस्यांचे गुपित उघड होताना पाहायला मिळतात. 
-    अभिनेता अक्षय केळकर हा बिग बॉस मराठीमुळे प्रसिद्धीझोतात आहे. मराठी टीव्ही मालिकांमधून प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचलेला अभिनेता म्हणून त्याला ओळखले जाते. 
-    गेल्या काही दिवसांपासून अक्षय केळकरच्या लव्ह लाईफबद्दल अनेक चर्चा सुरु होत्या. काही दिवसांपूर्वी त्याच्या गर्लफ्रेंडने त्याच्यासाठी पत्र पाठवले होते. हे पत्र वाचून तो भावूक झाला होता. 
-    त्यानंतर अक्षयने त्याची आणि त्याच्या गर्लफ्रेंडची पहिली ओळख कशी झाली? याचा खुलासा केला आहे. 
-    अक्षय केळकरने काही दिवसांपूर्वी तो आठ वर्षे एका मुलीबरोबर रिलेशनशिपमध्ये असल्याचे सांगितले होते. अक्षयच्या गर्लफ्रेंडचे नाव रमा असून हे तिचे टोपण नाव आहे. 
-    त्याला रमा माधव ही जोडी आवडत असल्याने त्याने तिला रमा हे नाव दिले आहे. 
-    “मी आणि रमा जेव्हा पहिल्यांदा भेटलो होतो ती गात होती. मी प्रेक्षक होतो. तिचे गाणं ऐकून मी भारावलो होतो. त्यावेळी मी ठरवलं होतं की लग्न करेन तर फक्त हिच्याशीच 
-    “मी त्यावेळी इंटरवलमध्ये तिला भेटायला गेलो, ती बाजूने गेली पण माझी बोलायची हिंमत झाली नाही.” 
-    “मग त्यानंतर मी फेसबुकला तिला मेसेज करायचो. हाय कशी आहे वैगरे असे अनेक मेसेज करायचो. पण तिने त्यावर काहीही उत्तर दिले नव्हते.” 
-    “एकदा मी तिला मेसेज केला की तुझा जेव्हा काही कार्यक्रम असेल तेव्हा मला सांग? त्यावर ती हो असं म्हणाली.” 
-    “त्यानंतर एक सप्ताह होता. तो सप्ताह माझ्या मित्राने आयोजित केला होता. मी सप्ताहला बसलो होतो. काही वेळाने मी मागे पाहिलं तर ती होती.” 
-    “त्यावेळी मी तिला विचारलं तू इथे कशी? त्यावर ती म्हणाली तू कसा इथे? त्यावर मी म्हणालो हे सर्व माझ्या मित्राने आयोजित केलेले आहे. त्यावर ती म्हणाले ते समोर जे गातात ते माझे बाबा आहेत.” 
-    “मग तू रोज सप्ताहला येणार का? असे तिने विचारले आणि मी त्यानंतर सात दिवस सप्ताह अटेंड केला. यानंतर मग आमचं बोलण सुरु झालं.” 
-    “फोन नंबरही मिळाला. पण त्यावेळी ती आणि तिचा भाऊ एकच फोन वापरायचे. मी तिला तिच्या वेळेला मेसेज करायचो. एकदा असचं मी तिला विचारले होते की तू मला आवडतेस. त्यावर ती म्हणाली हो का, फारच छान. त्यात एक दीड महिना गेला.” 
-    “त्यानंतर मी तिच्याशी बोलणं बंद केलं. मला ते खटकलं होतं. एक दिवस तिने मला विचारलं की तू बोलणं का टाकतोस? काय झालंय? त्यावर मी तिला स्पष्ट सांगितलं की मी तुला त्याच नजरेत बघितलं आहे.” 
-    “मैत्रीसाठी माझ्याकडे भरपूर पर्याय आहेत. अनेक मित्र-मैत्रिणी आहेत. यानंतरही तिने वेळ घेतला होता. तिने माझी चौकशीही केली होती.” 
-    “फेसबुकवरही फार सर्फिंग केलं होतं. यानंतर तिने मला विचारलं होतं की ‘तू मला पुन्हा विचारणार आहेस का?’ त्यावर मी तिला अजिबात नाही, असे उत्तर दिले.” 
-    “यानंतर तिने आपण भेटूया का, असे मला विचारले आणि आम्ही बस स्टॉपवर भेटलो.” 
-    “त्यावर मी तिला म्हटलं होतं की आपण पहिल्यांदा भेटतोय तर तू इतके गबाळे कपडे आणि केस अशी कशी येऊ शकतेस तू? तेव्हा ती म्हणाली ‘मी महत्त्वाची आहे की आणखी काय? मला तू आवडतो”. 
-    “त्यावेळी मला तिचा हा स्पष्टपणा फार आवडला. आजही ती तशीच राहते. ती लिपस्टिक लावत नाही, पावडर नाही, मेकअप नाही, तिला साधंच राहायला आवडतं.” 
-    “माझं आणि तिचं आठ वर्षांचं प्रेम आहे. पण ते पुढे खूप कठीण आहे.” 
-    “पण प्रेम आहे. मला शून्यापासून तिने बघितलंय आणि ती माझ्या घरच्यांना जास्त सांभाळते.” 
-    “मी त्यांच्याशी जास्त बोलत नाही. ती बोलते.” 
-    “जर मी खरं नाव घेतलं तर काहीही होणार नाही. माझी आठ वर्ष तिथेच थांबतील”, असेही अक्षयने यावेळी सांगितले. 
 
  “मी धर्मेंद्र यांच्या भावाला भेटल्यावर ३ दिवसांनी त्यांना गोळ्या घातल्या होत्या”, युवराज सिंगच्या वडिलांचे वक्तव्य 
   
  
  
  
  
  
   
   
   
   
   
   
  