-
२०२२ च्या शेवटच्या महिन्यात प्रेक्षकांसाठी ओटीटी माध्यमावर अनेक दर्जेदार चित्रपट, मालिका येत आहेत. महिन्याच्या सुरवातीलाच क्वाला हा चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होत आहे. हा चित्रपट संगीतावर भाष्य करणारा असून यात दिवंगत अभिनेता इरफान खानचा मुलगा बाबील खान पहिल्यांदाच काम करणार आहे.
-
बॉलिवूडचा सध्या चर्चेत असेलला अभिनेता कार्तिक आर्यन आता ओटीटी माध्यमावर दिसणार आहे.
-
कार्तिकचा ‘फ्रेडी’ चित्रपट २ डिसेंबर रोजी हॉटस्टार प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटासाठी त्याने मेहनत घेतली आहे.
-
अभिनेता विकी कौशल ‘सरदार उधम’ चित्रपटानंतर पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे.
-
विकीचा ‘गोविंदा नाम मेरा’ हा चित्रपट हॉटस्टारवर १६ डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे.
-
या चित्रपटात त्यांच्याबरोबर बॉलिवूडच्या दोन प्रसिद्ध अभिनेत्री कियारा अडवाणी आणि भूमी पेडणेकर असणार आहेत, तसेच या चित्रपटात अनेक मराठी कलाकार दिसणार आहेत.
-
मलायका अरोरा जरी चित्रपटसृष्टीपासून सध्या लांब असली तरी ती आता कार्यक्रमातून आपल्या भेटीस येणार आहे.
-
मलायका ‘मुव्हिंग इन विथ मलायका’ या कार्यक्रमामधून ओटीटीवर पदार्पण करत आहे. हा शो मलायकाच्या वैयक्तिक व व्यावसायिक आयुष्यावर आधारित असणार आहे.
-
मलायकाचा हा कार्यक्रम ५ डिसेंबरपासून हॉटस्टारवर सुरु होणार आहे.
-
‘पुष्पा’ फेम अभिनेत्री रश्मिका मंदना सध्या चर्चेत आहे. ती सोशल मीडियावर चाहत्यांच्या संपर्कात असते.
-
या दाक्षिणात्य अभिनेत्रीने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले असून, काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या ‘गुडबाय’ चित्रपटात ती झळकली होती.
-
हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारशी कमाई करू शकला नाही. आता हा चित्रपट नेटफ्लिसवर २ डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम

बापरे! बघता बघता अख्खा पूल गेला वाहून; गावकरी ओरडत राहिले अन्…पुराचा थरारक VIDEO पाहून धडकी भरेल