-
मराठी कलाविश्वातील लोकप्रिय जोडी हार्दिक जोशी-अक्षया देवधर शुक्रवार २ डिसेंबर रोजी विवाहबंधनात अडकले.
-
त्यांनी कुटुंबीय, मित्रपरिवार व नातेवाईंकांच्या उपस्थितीत सप्तपदी घेत लग्नगाठ बांधली.
-
या लग्नसोहळ्यात अक्षया-हार्दिकच्या पारंपारिक लूकसह मंगळसूत्रानेही लक्ष वेधून घेतले.
-
काळ्या मणीमध्ये सोन्याचे असलेले मणी आणि छान पेन्डंट असलेल्या या मंगळसूत्र फोटो व्हायरल झाले आहे.
-
फक्त हार्दिक आणि अक्षयाचं नव्हे तर मराठी सिनेसृष्टीतील अनेक कलाकारांच्या पत्नीच्या मंगळसूत्राची कायमच चर्चा रंगताना दिसते.
-
हार्दिक आणि अक्षयाबरोबर त्याच दिवशी अभिनेता आशय कुलकर्णीनेही लगीनगाठ बांधली. त्याच्या पत्नीच्या मंगळसूत्राचे फोटोही समोर आले आहेत.
-
तर काही महिन्यांपूर्वी विराजस कुलकर्णी आणि शिवानी रांगोळे विवाहबंधनात अडकले.
-
लग्नानंतर शिवानीने जांभळ्या रंगाची साडी, दागदागिने, नथ परिधान करत फोटो शेअर केला होता. यात तिच्या मंगळसूत्राच्या स्टाईलने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले होते.
-
अभिनेता सिद्धार्थ चांदेकरची पत्नी मितालीचे मंगळसूत्राचे डिझाईनही फारच खास आहे.
-
झी मराठीवरील ‘तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं’ या मालिकेत प्रमुख भूमिका साकारणारी अदिती म्हणजेच अभिनेत्री अमृता पवार काही दिवसांपूर्वी विवाहबंधनात अडकली.
-
तिच्या मंगळसूत्राने सर्वांचे लक्ष वेधले आहे. तिचे मंगळसूत्र हे अंत्यत सुंदर आणि नाजूक असून त्या डिझाईनची चर्चाही पाहायला मिळाली.
-
अभिनेत्री ऋता दुर्गुळेने काही महिन्यांपूर्वी लगीनगाठ बांधली. तिच्या मंगळसूत्राचे डिझाईन फारच खास आहे. यात काळे मणी आणि पेन्डेंट पाहायला मिळत आहे.
-
अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिने काही महिन्यांपूर्वी लग्नाच्या वाढदिवशी पुन्हा विवाहबंधनात अडकण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी तिच्या मंगळसूत्रानेही अनेकांचे लक्ष वेधले होते.
-
अभिनेत्री अभिज्ञा भावेने तिचे मंगळसूत्र खास अनोख्या स्टाईलचे बनवले आहे. तिच्या मंगळसूत्रामध्ये एम आणि ए ही दोन्ही इंग्रजीमधील अक्षरे दिसत आहेत.
-
एम म्हणजे तिचा पती मेहुल आणि ए म्हणजे अभिज्ञा. या दोन्ही इंग्रजी अक्षरांच्या बाजूला काळे मणी असल्याचे दिसत आहे.
-
अभिनेता सुयश टिळक हा देखील काही वर्षांपूर्वी विवाहबद्ध झाला.
-
त्याची पत्नी आयुषीच्या गळ्यातील मंगळसूत्राचे डिझाईनही अगदी हटके असल्याचे पाहायला मिळाले.
-
अभिनेत्री प्रार्थना बेहरे ही काही वर्षांपूर्वी विवाहबद्ध झाली. मात्र तिच्या मंगळसूत्राच्या डिझाईनची चर्चा कायमच होताना दिसते. (सर्व फोटो – इन्स्टाग्राम)

ऐश्वर्या नारकरांचा मुलगा भारतात परतला! एअरपोर्टवर गर्लफ्रेंडने ‘असं’ केलं स्वागत, ‘झी मराठी’च्या लोकप्रिय मालिकेत करते काम