-
२०२३ ची सुरुवात शाहरुखच्या ‘पठाण’ या बहुचर्चित चित्रपटाने होणार आहे,. तब्बल ४ वर्षांनी शाहरुख पुन्हा मोठ्या पडद्यावर दिसणार आहे. शाहरुख, दीपिका आणि जॉन यांचा हा ‘पठाण’ २५ जानेवारीला प्रदर्शित होणार आहे.
-
‘एक था टायगर’ आणि ‘टायगर जिंदा है’च्या यशानंतर सलमान खान पुन्हा एकदा त्याच्या नेहमीच्या अवतारात दिसणार आहे. सलमानबरोबरच कतरिना कैफ आणि इम्रान हाशमीसुद्धा यात महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. हा चित्रपट दिवाळीच्या मुहूर्तावर प्रदर्शित होऊ शकतो अशी शक्यता वर्तवली जात आहे.
-
२०२३ च्या जून महिन्यात शाहरुख पुन्हा आपल्याला मोठ्या पडद्यावर भेट देणार आहे. दाक्षिणात्य दिग्दर्शक अटली आणि अभिनेत्री नयनतारा यांच्याबरोबर शाहरुख ‘जवान’ चित्रपटातून प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज आहे.
-
ईदच्या दिवशी सलमान खान ‘किसी का भाई किसी की जान’ हा चित्रपट चाहत्यांसाठी घेऊन येत आहे. यामध्ये सलमानबरोबर अभिनेत्री पूजा हेगडे, शहनाज गील, सिद्धार्थ निगम हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.
-
येणारं वर्ष बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानसाठी खूप लकी आहे. यावर्षी ‘पठाण’, ‘जवान’बरोबरच ‘डंकी’ हा शाहरुखचा चित्रपटही प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन राजकुमार हिरानी करत असून अभिनेत्री तापसी पन्नू शाहरुखबरोबर झळकणार आहे. हा चित्रपट डिसेंबर महिन्यात प्रदर्शित होऊ शकतो.
-
कबीर सिंग’चे दिग्दर्शक संदीप वांगा रेड्डी हे ‘अॅनिमल’ हा चित्रपट घेऊन येत आहेत. या चित्रपटात रणबीर कपूर हा मुख्य भूमिकेत दिसणार असून त्याच्याबरोबर अनिल कपूर, परिणीती चोप्रा हे महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. नुकताच या चित्रपटातील रणबीरचा एक लूक व्हायरल झाला आहे. हा चित्रपट २०२३ च्या ऑगस्ट महिन्यात प्रदर्शित होणार आहे.
-
निर्माता, दिग्दर्शक करण जोहर ‘रॉकी और रानी की प्रेम कहाणी’ हा चित्रपट यावर्षी घेऊन येत आहे. आलिया भट्ट, रणवीर सिंग, धर्मेंद्र आणि शबाना आजमी यांच्या यात महत्त्वाच्या भूमिका आहेत. हा चित्रपट २८ एप्रिल २०२३ रोजी प्रदर्शित होणार आहे.
-
अल्लू अर्जुनच्या ‘आला वैकुंठपुरमुल्लो’चा हिंदी रिमेक पुढील वर्षी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यात कार्तिक आर्यन आणि कृती सनॉन प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट फेब्रुवारी महिन्यात चित्रपटगृहात धडकणार आहे.
-
टीझरमधील काही व्हीएफएक्समुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेला ‘आदिपुरुष’ हा चित्रपट जानेवारी महिन्यात प्रदर्शित होणार होता, पण प्रेक्षकांचा विरोध पाहता हा चित्रपट जून महिन्यात प्रदर्शित करायचा निर्णय दिग्दर्शक ओम राऊत यांनी घेतला आहे. (फोटो सौजन्य : सोशल मिडिया)

‘एचएसआरपी’ नंबर पाटीबाबत मोठी बातमी… राज्यात ३० टक्केच वाहनांना पाट्या लागल्या… १५ ऑगस्टनंतर…