-
मराठी बिग बॉसमुळे अभिनेत्री रुचिरा जाधव सध्या चर्चेत आहे.
-
बिग बॉस मराठी’च्या चौथ्या पर्वामध्ये सहभागी झाली होती. बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यापासून रुचिरा ही सोशल मीडियावर चांगलीच सक्रीय झाली आहे.
-
नुकतीच ती काश्मीरमध्ये फिरायला गेली असताना तिने स्वतःचे फोटो शेअर केले आहेत. तिच्या कॅप्शन सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
-
जेव्हा चित्रीकरणाची वेळ आली तेव्हा निसर्गाची सुंदरताबरोबर होती. मी खूप एन्जॉय केलं. मी एकदम नीट आहे, अशा शब्दात तिने भावना व्यक्त केल्या.
-
पुढे ती असं म्हणाली की मला नेहमीच काश्मीरमध्ये आल्यावर शिफॉन साडी परिधान करायची होती. एका संगीत व्हिडीओमुळे हे शक्य झाले हे करताना मी अक्षरशः थरथरत होते.
-
बिग बॉस कार्यक्रमात ती आणखीन चर्चेत आली ती म्हणजे तिच्या बॉयफ्रेंड डॉ. रोहित शिंदेमुळे, या पर्वात दोघे सहभागी झाले होते.
-
सध्या त्या दोघांच्याही रिलेशनशिपमध्ये फूट पडली. रुचिराने त्याला अनफॉलो केले आहे.
-
रुचिरा मूळची मुंबईची असून, ‘माझ्या नवऱ्याची बायको’ या मालिकेमुळे ती प्रसिद्धीच्या झोतात आली. ‘लकडाऊन’, ‘सोबत’ या मराठी चित्रपटांमध्ये तिने काम केले आहे.फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम
