-
बॉलिवूडचा भाईजान सलमान खान याची क्रेझ आजही तितकीच आहे. तब्बल ३ दशकं सलमान प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतोय.
-
आज सलमान त्याचा ५६ वा वाढदिवस साजरा करत आहे. भारतातील ‘Most eligible bachelor’ अशीही त्याची ओळख आहे.
-
सलमान त्याचे चित्रपट, त्याची स्टाइल, त्याचे ट्रेंड, त्याची कामाची पद्धत यामुळे चर्चेत असतोच.
-
त्याहून सलमानच्या कॉंट्रोवर्सी आणि लव्ह लाईफ या दोन गोष्टींची चर्चा आजही प्रचंड होते.
-
सलमानचं काळवीट शिकार प्रकरण किंवा फुटपाथ अपघात प्रकरण याची जेवढी चर्चा झाली तेवढीच चर्चा त्याच्या अफेअर्सचीसुद्धा झाली.
-
वेगवेगळ्या अभिनेत्रींबरोबर सलमानचं नाव जोडलं गेलं, बहुतेक सगळ्याच अभिनेत्रींना त्यांचा जोडीदार सापडला. पण तब्बल ६ अभिनेत्रींना डेट करूनही सगळ्यांचा लाडका भाईजान अजूनही सिंगलच आहे.
-
८० च्या दशकात मिस इंडिया हा खिताब मिळवणारी अभिनेत्री संगीता बिजलानीबरोबर सर्वप्रथम सलमानचं नाव जोडलं होतं. काही महीने त्यांनी एकमेकांना डेट केलं आणि नंतर ते वेगळे झाले. पण आजही सलमान आणि संगीता हे चांगले मित्र आहेत, बऱ्याच ठिकाणी दोघे एकत्र दिसतात.
-
पाकिस्तानी अभिनेत्री सोमी अली ही वयाच्या १५ व्या वर्षी सलमानला चित्रपटात बघताच त्याच्या प्रेमात पडली होती. १९९३ दरम्यान सोमी आणि सलमान हे दोघे रिलेशनशीपमध्येसुद्धा होते. नंतर काही कारणास्तव खटके उडायला सुरुवात झाल्यानंतर दोघे वेगळे झाले.
-
बॉलिवूडमध्ये सर्वात गाजलेलं प्रेमप्रकरण म्हणजे सलमान खान आणि ऐश्वर्या रायचं. १९९९ साली ‘हम दिल दे चुके सनम’ या चित्रपटाच्या निमित्ताने दोघे एकत्र आले. दोघे लग्न करणार एवढे ते एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाले होते. नंतर सलमानचा विक्षिप्तपणा ऐश्वर्याला खूपायला लागला. सलमान ऐश्वर्याच्या बाबतीत फारच सावध असायचा.
-
एकेदिवशी ऐश्वर्याच्या घराखाली दारू पिऊन सलमानने तमाशा केल्याच्या गोष्टीही तेव्हा कानावर आल्या होत्या. अर्थात नंतर ऐश्वर्याने सलमानपासून फारकत घेतली आणि अभिषेक बच्चनबरोबर संसार थाटला. त्यानंतर आजपर्यंत सलमान ऐश्वर्या यांनी एकमेकांचं तोंड बघायचंदेखील टाळलं.
-
आज बॉलिवूडवर राज्य करणाऱ्या कतरिना कैफला बॉलिवूडमध्ये बस्तान बसवणं सलमान खानमुळे शक्य झालं. हे दोघे एकमेकांना बरंच काळ डेट करत होते. सलमान याबाबत खूपच सीरियस होता.
-
कतरिनाच्या वाढदिवशी सलमान आणि शाहरुख खानदरम्यान झालेल्या भांडणानंतर कतरिनानेही सलमानला डच्चू दिला. नंतर ती रणबीर कपूरला डेट करत होती अखेर तिने अभिनेता विकी कौशलबरोबर लग्न केलं. हे ब्रेकअपसुद्धा सलमानला चांगलंच महागात पडलं.
-
सलमानने झरीन खानला सुद्धा पहिला ब्रेक दिला होता. तेव्हा काही दिवस सलमान आणि झरीनसुद्धा काही दिवस एकमेकांना डेट करत होते, पण दोघांनी याबाबत कुठेच खुलासा केलेला नाही.
-
रोमानियन अभिनेत्री लुलिया वेंतूरलासुद्धा सलमानने नुकताच बॉलिवूडमध्ये ब्रेक दिला आहे. सध्या सलमान आणि लुलिया एकमेकांना डेट करत असल्याच्या बातम्या कानावर येत आहेत.
-
अजूनतरी कोणती वेगळी गोष्ट बाहेर आली नसल्याने किमान लुलियाच्या रूपाततरी भाईजानला त्याचं खरं प्रेम मिळेल अशी सलमानच्या लाखो चाहत्यांना आशा आहे. (फोटो सौजन्य : इंडियन एक्सप्रेस)

“पुढील १० वर्षांत फक्त ‘याच’ नोकऱ्या टिकतील”; निखिल कामथ म्हणाले, “शिक्षण…”