-
लाखो तरुणींच्या हृदयाचा ठोका चुकवणारा ‘ग्रीक गॉड’ अर्थात अभिनेता हृतिक रोशनचा आज वाढदिवस आहे.
-
त्याने २००० साली ‘कहो ना प्यार है’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आणि रातोरात तो प्रसिद्धीच्या झोतात आला.
-
त्याचा डॅशिंग लूक आणि डान्सिंग स्टाइलवर लाखो तरुणी घायाळ होतात.
-
वाढदिवसानिमित्त हृतिकबद्दलच्या काही रंजक गोष्टी जाणून घेऊयात..
-
हृतिकला फोटोग्राफीचीही आवड आहे. त्याच्या याच छंदामुळे हृतिक त्याची स्क्रॅपबूक नेहमीच अपडेट ठेवतो. या स्क्रॅपबूकमध्ये हृतिक त्याने काढलेले फोटो रोज अपडेट करतो.
-
हृतिकच्या चाहत्यांमध्ये महिलांचे प्रमाण सर्वात जास्त आहे.
-
१४ फेब्रुवारी २००० मध्ये त्याला व्हेलेंटाइन डेला जवळपास ३० हजार लग्नाच्या मागण्या आलेल्या, असे हृतिक एका मुलाखतीत म्हटले होते.
-
त्याचा पहिला चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर देशभरातून तब्बल ३० हजार मुलींनी त्याला लग्नाची मागणी घातली होती.
-
अमिषा पटेलही मुख्य भूमिकेत असलेला हा चित्रपट सुपरहिट ठरला होता. चित्रपटाने त्याकाळी तब्बल ८० कोटींचा गल्ला जमवला होता.
-
दरम्यान, हृतिकने सुझान खानशी लग्न केलं होतं. पण दोघेही विभक्त झाले.
-
हृतिक रोशन सध्या सबा आझादला डेट करतोय.
-
दोघेही एकत्र फिरताना आणि वेळ घालवताना दिसतात. (फोटो – हृतिक रोशनच्या इन्स्टाग्रामवरून साभार)

मुंबईच्या रस्त्यावर फिरतोय भलामोठा अजगर; मुंबईकरांनो पावसाच्या पाण्यात चालताना सावधान! VIDEO पाहून घाम फुटेल