-
दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीचा प्रसिद्ध अभिनेता विजय सेतुपतीचा ४५ वा वाढदिवस आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहते त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत.
-
लवकरच विजय सेतुपती शाहिद कपूरबरोबर ‘फर्जी’ या नव्या वेबसीरिजमध्ये झळकणार आहे. नुकताच याचा ट्रेलर प्रदर्शित झाला असून प्रेक्षकांनी याला उत्तम प्रतिसाद दिला आहे.
-
विजयला अभिनयाची लहानपणापासूनच आवड होती, पण केवळ ऊंची आणि चेहेऱ्यामुळे त्याला या क्षेत्रात संधी मिळत नव्हती.
-
अभिनय क्षेत्रात येण्याआधी पोट भरण्यासाठी विजयने रिटेल स्टोअर्स तसेच फास्ट फूडच्या दुकानातही काम केलं.
-
इतकंच नव्हे तर विजय सेतुपतीने एका टेलिफोन बूथवर ऑपरेटरची नोकरीदेखील केली.
-
२०१० च्या ‘थेनमुर्क परुवाकाटरू’ या चित्रपटातून विजय सेतुपतीला मोठा ब्रेक मिळाला आणि मग त्याने मागे वळून पाहिलं नाही.
-
दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत विजयने स्वतःचं स्थान निर्माण केलं आहे. त्याच्या बऱ्याच चित्रपटांचे रिमेक बॉलिवूडमध्ये झाले आहेत.
-
नुकtतंच त्याने कमल हासन, फहाद फाजीलबरोबर ‘विक्रम’ या चित्रपटात काम केलं. लोकांनी हा चित्रपट आणि विजयचं काम डोक्यावर घेतलं.
-
विजय सेतुपतीची संपत्ती ही तब्बल ११० कोटी इतकी आहे. याबरोबरच त्याने लेखन आणि निर्मिती क्षेत्रातही नशीब आजमावलं आहे. (फोटो सौजन्य : इंडियन एक्सप्रेस)

मराठी अभिनेत्याला नाटकाच्या प्रयोगाआधी हृदय विकाराचा झटका; डॉक्टरांना म्हणाला, “मला ३ तासांची परवानगी द्या…”