-    अभिनेत्री राखी सावंतचा पती आदिल खान दुर्रानीला पोलिसांनी अटक केली आहे. आदिल खानला ओशिवरा पोलिसांनी अटक केली आहे. 
-    त्याच्या अटकेमागचं कारण अद्याप समोर आलेलं नाही. पण, राखी आणि आदिलमध्ये गेले काही दिवस सातत्याने वाद सुरू आहेत. 
-    त्यातूनच आदिलला पोलिसांनी अटक केली असू शकते, असं म्हटलं जातंय. 
-    आदिल खान राखीपेक्षा १७ वर्षांनी लहान आहे. तो एक व्यावसायिक आहे. 
-    मीडिया रिपोर्टनुसार, आदिलने सुरुवातीला आइसक्रिम पार्लरचा व्यवसाय केला होता. 
-    त्यानंतर त्याने ‘ए.डी.थिंक.फील.ड्राइव्ह’ हा कारचा व्यवसाय सुरू केला. 
-    आदिल आलिशान आयुष्य जगत असून तो महागड्या गाड्यांचा शौकीन आहे. 
-    त्याने राखीला ४३ लाख किंमतीची बीएमडब्ल्यू गिफ्ट म्हणून दिली होती. आदिल सात ते आठ कोटी संपत्तीचा मालक आहे. 
-    राखी सावंतने गेल्या काही दिवसांत आदिलवर गंभीर आरोप केले आहेत. 
-    दुसऱ्या मुलीबरोबर अफेअर असण्याबरोबरच पैसे चोरल्याचा, मारहाण केल्याचा आरोप राखीने केला आहे. 
-    राखी व आदिलने मे २०२२मध्ये कोर्ट मॅरेज केलं होतं. सात महिन्यांनंतर राखीने याबाबत खुलासा केल्यानंतर अनेक दिवसांच्या ड्राम्यानंतर आदिलने ते मान्य केलं होतं. (सर्व फोटो : लोकसत्ता ग्राफिक्स टीम) 
 
  प्रसिद्ध अभिनेत्याने घटस्फोटानंतर ९ वर्षांनी केला साखरपुडा; अमृता खानविलकर कमेंट करत म्हणाली… 
   
  
  
  
  
  
   
   
   
   
   
   
  