-
आपल्या मखमली आवाजाने कित्येकांच्या मनावर राज्य करणारे गझल सम्राट जगजीत सिंग यांची आज जयंती. ८ फेब्रुवारी १९४१ साली राजस्थानमध्ये जन्मेलेल्या जगजीत सिंग त्यांना गायकीचा वारसा त्यांच्या वडिलांपासूनच मिळाला.
-
‘होठों से छू लो तुम’, ‘झुकी झुकी सी नजर’, ‘होश वालों को खबर क्या’, ‘चिट्ठी न कोई संदेश’, ‘ये दौलत भी ले लो’ अशा असंख्य गझल्सच्या माध्यमातून जगजीत सिंग लाखों संगीतप्रेमींच्या स्मरणात आहेत.
-
जगजीत सिंग यांनी ऑल इंडिया रेडिओ (AIR) जालंधर स्टेशनमधून गायन आणि संगीत रचना करून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली.
-
७० च्या दशकात त्यांचा पहिला अल्बम हीट ठरला आणि मग नंतर त्यांनी मागे वळून पाहिलंच नाही.
-
९० च्या दशकात बऱ्याच बॉलिवूड चित्रपटांसाठी त्यांनी गझल्स संगीतबद्ध केल्या आणि गायल्या देखील.
-
जगजीत सिंग यांच्या गायकीप्रमाणेच त्यांनी गायिका चित्रा सिंगशी केलेल्या लग्नाचीसुद्धा जबरदस्त चर्चा झाली. १९६७ मध्ये जेव्हा प्रथम चित्रा यांची जगजीत सिंग यांच्याशी भेट झाली, तेव्हा त्यांचा आवाज फार भारदस्त आहे हे कारण सांगून चित्रा यांनी त्याच्यासह गाणं रेकॉर्ड करण्यास नकार दिला होता. पुढे जाऊन गझल विश्वातील लोकप्रिय जोडी म्हणून यांना खूप लोकप्रियता मिळाली.
-
जगजीत आणि चित्रा जेव्हा भेटले तेव्हा चित्रा या त्यांच्या पहिल्या नवऱ्यापासून वेगळ्या राहत होत्या. जेव्हा जगजीत यांनी चित्रा यांना लग्नासाठी मागणी घातली तेव्हा प्रथम त्यांनी नकार दिला आणि आपल्या वैयक्तिक जीवनातील परिस्थितीबद्दल सांगितलं. नंतर मात्र जगजीत यांनी ही गोष्ट फारच मनावर घेतली, त्यांनी थेट चित्रा यांच्या पहिल्या पतीकडे म्हणजेच देबो प्रसाद दत्ता यांच्याकडेच चित्रा यांच्याशी लग्न करायचा विचार मांडला, आणि पुढे नंतर लग्न करून या दोघांनी सुखी संसार थाटला.
-
जगजीत सिंग आणि चित्रा यांचा विवाहसोहळा अवघ्या ३० रुपयांमध्ये अतिशय साध्या पद्धतीने पार पडला होता. तबला वादक हरीश यांनी त्यांच्या लग्नाची सर्व व्यवस्था केली होती. नंतर या दोघांनी एकाहून एक सरस अशी गाणी दिली, कालांतराने गझल स्पेशल म्हणून या दोघांची जोडी प्रचंड लोकप्रिय झाली.
-
जगजीत आणि चित्रा यांना मुलगाही झाला. त्याचं नाव होतं विवेक, पण दुर्दैवाने वयाच्या १८ व्या वर्षी एका कार अपघातात त्याचा मृत्यू झाला. १० ऑक्टोबर २०११ रोजी मुंबईच्या लीलावती रुग्णालयात जगजीत सिंग यांनी अखेरचा श्वास घेतला. (फोटो सौजन्य : इंडियन एक्सप्रेस आणि ट्विटर)

डोक्यातील निगेटिव्ह विचारांमुळे रात्री झोपच लागत नाही? फक्त ५ उपाय; शांत लागेल झोप