-
प्रेम हा विषय तर बॉलिवूडच्या दिग्दर्शकांचा हक्काचा विषय. यश चोप्रा दिग्दर्शित ‘दिल तो पागल हैं’ हा एक रोमँटिक चित्रपट होता. ज्यात शाहरुख खान, करिश्मा कपूर, माधुरी दीक्षित आणि अक्षय कुमार अशी तगडी स्टारकास्ट यात होती.
-
शाहरुख काजोलचा ‘दिलवाले दुलहनिया ले जायेंगे’ चित्रपटाने इतिहास रचला. या चित्रपटातील प्रेमकथा प्रत्येक जोडप्याला आपलीशी वाटते. हा चित्रपट आजही मुंबईतील मराठा मंदिरात सुरु आहे.
-
इम्तियाज अली दिग्दर्शित ‘जब वी मेट’ चित्रपट हा चित्रपट आजही अनेकजण आवर्जून बघतात कारण यातप्रेमाचे अनेक पैलू या चित्रपटात दाखवले आहेत. करीना कपूर, शाहिद कपूर या जोडीने अप्रतिम काम केलं आहे.
-
बॉलिवूडचा चॉकलेट बॉय अर्थात रणबीर कपूरचा ‘रॉकस्टार’ खऱ्या अर्थाने संगीतामुळे हिट झाला मात्र त्यातील प्रेमकहाणी प्रेक्षक विसरलेले नाहीत. अपूर्ण’ प्रेमकथेने लाखो लोकांची मने जिंकली. या चित्रपटातील गाणी विशेष गाजली.
-
कॉलेज विश्व, प्रेम, मैत्री या सगळ्याचा पुरेपूर वापर करून करण जोहरने ‘कुछ कुछ होता है’ चित्रपट बनवला होता. हा चित्रपट तरुणाईला जास्त भावाला. रोमान्सचा बादशाह असलेला शाहरुख खान, काजोल आणि राणी मुखर्जी पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत सलमान खान या सगळ्यांनी हा चित्रपट एका उंचीवर नेऊन ठेवला.
-
२००० दशकाच्या सुरवातीस आलेला विवेक ओबेरॉय, राणी मुखर्जी या फ्रेश जोडीचा ‘साथिया’ चित्रपट सुपरहिट ठरला होता. प्रेमकहाणी, गुपचूप लग्न, विरह या गोष्टी दाखवण्यात आल्या होत्या. विशेष म्हणजे यातील गाणी आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहेत.
-
‘लव्ह आजकल’ हा इम्तियाज अलीचा आणखीन एक चित्रपट ज्यात दोन काळांमधील प्रेमकहाणी दाखवली आहे. काळाप्रमाणे प्रेमाची व्याख्या कशी बदलत गेली यावर भाष्य केलं आहे.
-
रणबीर दीपिका पदुकोण या जोडीचा ‘ये जवानी दिवानी’ चित्रपटाने पुन्हा एकदा तरुणाईला भुरळ पाडली. अयान मुखर्जीने या चित्रपटाचे दिग्दर्शन केलं होतं. मैत्री प्रेम यावर चित्रपटात भाष्य केलं होतं.
-
प्रसिद्ध लेखक चेतन भगत यांच्या ‘टु स्टेस्ट’ या पुस्तकावर बेतलेला आलिया भट्ट, अर्जुन कपूरचा ‘टु स्टेस्ट’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस पडला होता. दोन वेगळ्या राज्यातले तरुण तरुणी एकमेकांच्या प्रेमात पडतात आणि पुढे एकत्र येण्यासाठी कसे एकत्र येतात हे दाखवले आहे. फोटो सौजन्य : आयएमडीबी

‘रानू बंबई की रानू’… गाण्यावर चिमुकल्यांचा भन्नाट डान्स; VIDEO पाहून नेटकरी करतायत कौतुक