-
सुहासिनी मुळ्ये हे मराठी व हिंदी चित्रपटसृष्टीत तसेच टेलिव्हिजनमधील प्रसिद्ध नाव आहे.
-
सुहासिनी यांनी १९६९ मध्ये करिअरची सुरुवात केली होती.
-
आतापर्यंत त्यांनी अनेक चित्रपट व मालिकांमध्ये काम केलंय.
-
सुहासिनी यांनी ‘लगान’, ‘दिल चाहता है’, ‘जोधा अकबर’ या चित्रपटांमध्ये उल्लेखनीय भूमिका साकारल्या.
-
पण, त्या त्यांच्या लग्नामुळे खूप चर्चेत राहिल्या होत्या. त्यांनी वयाच्या ६०व्या वर्षी लग्नगाठ बांधली होती.
-
सुहासिनी यांनी २०११ मध्ये अतुल गुर्तु यांच्याशी लग्नगाठ बांधली होती.
-
त्यांचे पती अतुल हे फिजिसिस्ट असून फेसबुकद्वारे दोघांची ओळख झाली होती, ओळखीचं रुपांतर प्रेमात झालं आणि त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला होता.
-
लग्नाच्या वेळी अतुल हे ६५ वर्षांचे होते. त्यांचं हे दुसरं लग्न होत. त्यांच्या पहिल्या पत्नीचं कॅन्सरमुळे निधन झालं होतं.
-
दोघांनी आधी कोर्ट मॅरेज केलं होतं, नंतर पारंपारिक पद्धतीने ते विवाह बंधनात अडकले होते.
-
१९९० च्या दशकात सुहासिनी रिलेशनशिपमध्ये होत्या असं म्हटलं जातं. मात्र त्या ब्रेकअपनंतर त्यांनी पुन्हा कधीच लग्नाचा विचार केला नाही.
-
अतुल यांचा एक लेख वाचून त्या खूप प्रभावित झाल्या होत्या, त्यानंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता.
-
(फोटो- सुहासिनी मुळ्ये इन्स्टाग्राम आणि सोशल मीडियावरून साभार)

मोलकरणीने लघवीने पुसलं मालकाचं घर, CCTV मुळे झाला खुलासा, पोलिसांना म्हणाली, “मी काम…”