-
बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा ही सध्या चांगलीच चर्चेत आहे.
-
आप नेते राघव चड्ढा यांच्याबरोबर लवकरच परिणीती लग्नबंधनात अडकणार असल्याचं म्हंटलं जात आहे.
-
नुकतंच या दोघांना काही ठिकाणी एकत्र पाहिल्याने त्यांच्यातील या नात्याबद्दल ही गोष्ट उघडकीस आली.
-
परिणीतीने नुकतंच अमिताभ बच्चन यांच्या ‘उंचाई’ चित्रपटात काम केलं होतं.
-
राघवआधी परिणीतीचं नाव इतरही काही बॉलिवूड अभिनेत्यांसह जोडण्यात आलं होतं.
-
अभिनेता अर्जुन कपूरबरोबर प्रथम परिणीतीचं नाव जोडण्यात आलं होतं. या दोघांनी एकत्रच ‘इशकजादे’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. अर्थात या दोघांनी कधीच त्यांच्या या नात्याबद्दल उघडपणे भाष्य केलं नाही.
-
त्यानंतर परिणीतीचं नाव आदित्य रॉय कपूरबरोबर जोडण्यात आलं. दोघांनी ‘दावत ए इश्क’ या चित्रपटात एकत्र काम केलं होतं, पण नंतर मात्र हे दोघे चांगले मित्र असल्याचं समोर आलं.
-
नुकतंच परिणीतीने हार्डी संधु या पंजाबी अभिनेत्यासह ‘कोड तिरंगा’ या चित्रपटात एकत्र काम केलं. यावेळी हे दोघे एकमेकांना डेट करत असल्यचं म्हंटलं जात होतं.
-
अर्थात यापैकी कोणत्याही नात्याबद्दल परिणीतीने कधीच उघडपणे भाष्य केलं नाही. आता परिणीती आणि राघव यांच्याबद्दल चर्चा रंगत आहेत. आप खासदार संजय अरोरा यांनीही शुभेच्छा देत या दोघांच्या नात्यावर शिक्कामोर्तब केलं होतं. (फोटो सौजन्य : परिणीती चोप्रा / इन्स्टाग्राम)

Nimisha Priya : भारतीय नर्स निमिषा प्रियाला १६ जुलै रोजी येमेनमध्ये होणार फाशी, जाणून घ्या नेमकं हे सगळं प्रकरण काय?