-
दुरचित्रवाणीवरील सगळ्यात प्रसिद्द मालिका ‘रामायण’ला आजही लोक तेवढ्यात आवडीने बघतात.
-
रामायण २५ जानेवारी १९८७ पासून ३१ जुलै १९८८ पर्यंत दुरदर्शनवर प्रसारित करण्यात आली होती.
-
रामायण ही त्या काळातली सगळ्यात गाजलेली मालिका होती.
-
२०२० साली कोविड काळात या मालिकेला पुन्हा प्रसारित करण्यात आलं होतं
-
रामायण मालिकेच्या टीआरपीने सगळे रेकॉर्डस तोडले होते.
-
एवढेच नाही तर रामायण मालिकेच्या पहिल्या भाग ४० दशलक्ष लोकांनी पाहिला होता. लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्सने याची आकडेवारी जाहीर केली आहे.
-
त्यावेळी रामायण केवळ भारतातच नाही तर ५३ वेगवेगळ्या देशांमध्ये दाखवले जात होते.
-
रामायण जगभरातील ६५० दशलक्षाहून अधिक दर्शकांनी पाहिले होते.
-
रामानंद सागर यांची ही मालिका संपूर्ण जगात सर्वात जास्त पाहिली जाणारी पौराणिक मालिका बनली.
-
रामायण मालिकेमध्ये अरुण गोविल यांनी रामाची तर दीपिका चिखलीया यांनी सीतेची भुमिका साकारली होती
-
प्रेक्षकांना या दोघांची भुमिका सर्वाधिक आवडली होती.
-
काही काळानंतर तर लोक या दोघांना खरेखरे राम आणि सीता मानू लागले होते.
-
मीडिया रिपोर्टनुसार रामानंद सागर या मालिकेचा एक भाग बनवण्यासाठी लाखो रुपये खर्च करत होते.
-
रामायणचा एक भाग चित्रित करण्यासाठी जवळजवळ ९ लाख रुपये खर्च येत होता.
-
मात्र, एका भागाची कमाई ४० लाख रुपये होत होती.
-
रामायणचे एकूण ७८ भाग प्रसारित झाले.
-
यासाठी एकूण ७ कोटी रुपये खर्च आला होता.
-
रामायण मालिकेच्या निर्दशकांनी या मालिकेच्या प्रसारणातून एकूण ३१ कोटी चार लाख रुपयांची कमाई केली होती.

‘स्टार प्रवाह’च्या लोकप्रिय शोमध्ये एन्ट्री घेतल्यावर निलेश साबळेची पहिली प्रतिक्रिया; म्हणाला, “इतक्या आपुलकीने…”