-
शिव ठाकरे सध्या ‘खतरों के खिलाडी’मुळे चांगलाच चर्चेत आहे.
-
‘बिग बॉस’मुळे शिव ठाकरे प्रसिद्धीझोतात आला. पण त्याचा हा प्रवास सोपा नव्हता.
-
शिव ठाकरे मूळचा अमरावतीचा. त्यांच्या घरची परिस्थिती बेताची होती.
-
शिव ठाकरेच्या वडिलांची पानटपरी होती. तिथे शिव त्यांना मदत करायचा. काम केल्यानंतर वडील त्याला बाहेर खाण्यासाठी ५ रुपये द्यायचे, पण त्याला २० रुपये लागायचे. तेव्हा शिव ते १५ रुपये स्वतः मेहनत करून कमवायचा.
-
यानंतर काही वर्षांनी शिवने डान्स क्लासेस घेण्यास सुरुवात केली. याचदरम्यान शिवने फिटनेसकडेही लक्ष दिलं आणि नंतर तो रोडीजमध्ये सहभागी झाला.
-
रोडीजनंतर शिव मराठी ‘बिग बॉस’ मराठीच्या दुसऱ्या पर्वामध्ये सहभागी झाला. शिव ठाकरेने या पर्वाच्या ट्रॉफीवर त्याचं नाव कोरलं.
-
‘बिग बॉस’ मराठीमध्ये सहभागी होऊन त्याने स्वतःची ओळख निर्माण केली. यानंतर तो ‘बिग बॉस’ हिंदीच्या १६व्या पर्वात झळकला.
-
या कार्यक्रमामुळे त्याची लोकप्रियता प्रचंड वाढली. आता देशभरातील लोक त्याला ओळखतात. हे पर्व संपल्यावर शिवने पहिल्यांदाच स्वतःची नवीन आलिशान गाडी खरेदी केली.
-
आता तो ‘खतरों के खिलाडी १३’मध्ये सहभागी होणार आहे. य कार्यक्रमाच्या एका एपिसोडसाठी तो ८ लाख रुपये मानधन घेणार असल्याचं समोर आलं आहे.

IND vs ENG: नशीब फुटकं राव! विकेट मिळाली पण बुमराहच्या एका चुकीमुळे मेहनतीवर फेरलं पाणी; नेमकं काय घडलं?