-
‘भूल भुलैया २’ नंतर कियारा अडवाणी आणि कार्तिक आर्यनची जोडी पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
-
या दोघांचा ‘सत्यप्रेम की कथा’ चित्रपट २९ जून रोजी प्रदर्शित होणार आहे.
-
या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आला.
-
या ट्रेलरला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे.
-
या चित्रपटाच्या या चित्रपटाच्या स्टारकास्टवर निर्मात्यांनी मोठा खर्च केला असल्याचे सांगण्यात येत आहे.
-
या चित्रपटासाठी कार्तिकने २५ कोटी रुपये फी घेतली असल्याचे सांगण्यात येत आहे.
-
‘भूल भुलैया २’च्या यशानंतर कार्तिकने त्याची फी वाढवली असल्याचे बोलले जात आहे.
-
कियाराला या चित्रपटासाठी ४ कोटी रुपये मानधन देण्यात आले आहे.
-
मात्र, या बातम्यांना अद्याप कोणताही दुजोरा मिळालेला नाही.
-
कार्तिक आणि कियाराशिवाय गजराज राव आणि सुप्रिया पाठक सारखे कलाकारही या चित्रपटात दिसणार आहेत.
-
समीर विधानस यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.
-
छायाचित्र लोकसत्ता, जनसत्ता, इंडियन एक्प्रेस

GT vs MI: जसप्रीत बुमराहचा एक बॉल ठरला मुंबईच्या विजयाचा टर्निंग पॉईंट, १४व्या षटकात नेमकं काय घडलं? जाणून घ्या