-
प्रभास आणि क्रिती सेनॉनचा ‘आदिपुरुष’ चित्रपट सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे
-
चित्रपटातील संवाद आणि काही दृष्यांवरुन वाद पेटला आहे.
-
या चित्रपटाचे संवाद लेखन मनोज मुंतशीर यांनी केलं आहे.
-
पण तुम्हाला माहीत आहे का, वादात अडकलेले ४७ वर्षीय मनोज मुंतशीर कोण आहेत आणि त्यांच्याकडे किती संपत्ती आहे? हे तुम्हाला माहिती आहे का?
-
मनोज मुनताशीर यांचे खरे नाव मनोज शुक्ला असून मुंतशीर हे त्यांचे टोपणनाव आहे.
-
मुंबईत येण्यापूर्वी मनोज प्रयागराजमध्ये ऑल इंडिया रेडिओमध्ये काम करायचे.
-
मनोज मुंतशीर यांनी मुंबईला पोहोचल्यानंतर अनूप जलोटा यांची भेट घेतली.
-
मनोजने अनूप जलोटा यांना एक गझल ऐकवली होती. यावर खूश होऊन अनूप जलोटा यांनी ३ हजार रुपये दिले होते.
-
मनोज यांनी इंडस्ट्रीत येण्यापूर्वी खूप संघर्ष केला.
-
मात्र आता आपल्या मेहनतीच्या जोरावर मनोज मुंतशीर यांनी प्रसिद्धीसोबतच भरपूर संपत्तीही जमवली आहे.
-
विकिपीडिया, फोर्ब्स, IMDb सारख्या अनेक ऑनलाइन संसाधनांनुसार, मनोज मुनताशीरची एकूण संपत्ती $६२ दशलक्ष आहे.
-
मनोज यांच्याकडे कारचे खास कलेक्शनही आहे.
-
त्यांच्याकडे 88 लाख रुपयांची ऑडी Q7 आहे, जी ५.९ सेकंदात ०-१०० किमी प्रतितास वेग वाढवते.
-
मनोज यांनी आत्तापर्यंत बॉलिवूडमधील अनेक प्रसिद्ध गीतांचे लेखन केलं आहे.
-
‘तेरी गल्लियाँ’, ‘तेरे संग यारा’, ‘कौन तुझे’, ‘दिल मेरी ना सुने’, ‘फिर भी तुमको चाहूंगा’, ‘तेरी मिट्टी’ या गाण्यांचा समावेश आहे.

पुढच्या वर्षी बाप्पा उशिरा येणार! ‘या’ तारखेला साजरी केली जाईल गणेश चतुर्थी