-
माधुरी दीक्षित ही बॉलीवूडमधील आघाडीची अभिनेत्री आहे.
-
आतापर्यंत तिने अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केलं आहे.
-
या तिच्या संपूर्ण करिअरमध्ये तिला तिच्या आईची भक्कम साथ लाभली.
-
माधुरी दीक्षितची आई स्नेहलता दीक्षित यांचं काही दिवसांपूर्वीच वृद्धापकाळाने निधन झालं.
-
तर आज माधुरी दीक्षितच्या आईचा जन्मदिन असतो. त्यानिमित्त माधुरीने आईबरोबरच्या काही जुन्या आठवणी फोटोंमधून जागवल्या.
-
आईच्या जन्मदिनानिमित्त माधुरीने आज सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर केली. या पोस्टमधून तिने आईबद्दलचं प्रेम व्यक्त केलं.
-
ही पोस्ट शेअर करताना तिने तिचे आणि तिच्या आईचे कधीही न पाहिलेले अनेक फोटो शेअर केले.
-
एका फोटोमध्ये माधुरी दीक्षितची आई तिच्याबरोबर रेकॉर्डिंग स्टुडिओमध्ये असल्याचं दिसत आहे, तर इतर फोटोंमध्ये त्या दोघी एकत्र सण आणि वाढदिवस साजरे करत असल्याचा दिसत आहे.
-
माधुरी दीक्षितची ही पोस्ट आता सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत असून तिचे चाहते त्यावर कमेंट करत तिची ही पोस्ट आवडल्याचं सांगत आहेत

IPL 2025 Playoffs: क्वालिफायर-१ आणि एलिमिनेटरचे संघ ठरले! कधी, कुठे आणि किती वाजता खेळवले जाणार सामने? जाणून घ्या